बीड मध्ये हारवलेला मंत्री योगेश कदम यांचा मोबाईल अखेर सापडला
Where was the mobile phone of Minister of State for Home Affairs Yogesh Kadam, which was lost in Massajog, found?

दिनांक 05/04/2025 वेगवान मराठी प्रतिनिधी बीड केशव डी मुंडे

आज दिनांक 05/04/2025 रोजी विविध समाज माध्यमांवर व विविध न्यूज पोर्टलवर मा. योगेश कदम, राज्यमंत्री (गृह) महाराष्ट्र राज्य हे मस्साजोग ता. केज येथे आलेले असतांना त्यांचा मोबाईल गहाळ/चोरी गेल्याची बातमी प्रसारित झाली आहे.
परंतु सदर बाबत सत्यता अशी आहे की, मा. मंत्री महोदय हे मस्साजोग येथे धनंजय देशमुख व कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी धनंजय देशमुख यांचे शेजारी बसलेले होते.
पत्रकारांशी संवाद साधताना मोबाईल खाली ठेवला होता त्यानंतर ते बांधकाम सुरू असलेले घराची पाहणी करण्यासाठी चालत गेले.
घराची पाहणी करत असताना त्यांनी पीएंकडे मोबाईल मागीतला त्यावेळी पीएंनी माझ्याकडे मोबाईल नाही असे सांगीतले.
त्यावेळी मंत्री महोदय यांनी मोबाईल शोधा असे म्हटले. हे वाक्य उपस्थित लोकांपैकी कुणीतरी ऐकून बाहेर वाच्यता केली.
परंतु मंत्री महोदय व जिल्हाध्यक्ष अनिल जगताप हे जाण्यासाठी गाडीत बसले असता कोणीतरी मोबाईल आणून अनिल जगताप यांच्याकडे दिला.
गाडीत बसल्यानंतर तो मोबाईल जगताप यांनी मंत्री महोदयांना दिला. मंत्री महोदयांना मोबाईल दिला हे बाहेर माहीत नसल्यामुळे या अफवा पसरवल्या गेल्या
मंत्री महोदय यांचा मोबाईल गहाळ झालेला नाही. कृपया कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन बीड पोलीस अधीक्षक श्री.नवनीत कॉंवत यांनी केले आहे.
पोलीस अधीक्षक बीड करीता
प्रति,–वेगवान मराठी संपादक

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








