सेक्स हि मजा घेण्याची गोष्ट -अभिनेत्रीचे बिंधास्त वक्तव्य
Sex is a matter of fun and pleasure - Actress Neena Gupta

शारीरिक_संबंध ही मजा घेण्याची गोष्ट आहे, हे महिलांना माहितीच नाहीये’
नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीदरम्यान महिलांच्या शारीरिक_सुखाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
वेगवान मराठी प्रतिनिधी के डी मुंडे मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री नीना_गुप्ता नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्या परखडपणे आपले विचार आणि मत मांडतात. अशातच आता एका मुलाखतीदरम्यान नीना गुप्ता यांनी भारतीय महिला आणि त्यांचं शारीरिक संबंध यावरचं मत याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
नीना गुप्ता यांनी केलेलं भारतीय महिलांचं सेक्सविषयीचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
लिली सिंग यांच्या मुलाखतीमध्ये नीना गुप्ता म्हणाल्या की,
‘सेक्सचा आपल्याकडे फारच बाऊ केला जातो. मला भारतीय महिलांबाबत फार वाईट वाटतं, भारतातील ९५ टक्के महिलांना हे माहित नाही की, शरीरसंबंध ही मजा घेण्याची गोष्ट आहे.
त्यांना वाटतं की, हे फक्त पुरुषांना खुश करण्यासाठी, आणि मुलं जन्माला घालण्यासाठी आहे.’
नीना गुप्ता यांच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून ‘हे खरं आहे, ही संकल्पना अजूनही बऱ्याच महिलांना स्पष्ट पणे समजत नाही…
एक डॉक्टर म्हणून, मी म्हणेन की हे तुमच्या शरीराच्या इतर कोणत्याही बदलांइतकंच सामान्य आहे.हे खूप दुःखद आहे, पण तेवढंच खरं आहे.
महिलांना त्यांचं शरीर समजून घेण्याचा आणि त्यांच्या जोडीदाराकडून आनंदाची अपेक्षा करण्याचा अधिकार आहे.’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
लिली सिंगशी बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या, ‘आमच्या चित्रपटांमध्ये काय दाखवलं जायचं? जर तुम्ही एक महिला असाल तर तुमचे मूळ ध्येय पुरुष शोधणं होतं.
खरं तर, मला आधी वाटत होतं की, जर आपण किस केलं तर आपण प्रेग्नन्ट राहू शकतो. मला खरोखर ते खरं वाटलं. आमच्या चित्रपटांनी आम्हाला हेच दाखवलं.’
पुढे बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या की, आमच्या चित्रपटांमधून पुरुषांना काय धडा मिळाला, ते शिकले की ते बॉस आहेत. आजही, बहुतेक चित्रपटांमधून आपण शिकतो तो हाच मुख्य धडा आहे.’
महिला पुरूषांपेक्षा जास्त कमावतात
नीना पुढे म्हणाल्या की…
‘महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आपल्या व्यवस्थेत बरेच बदल झाले आहेत.
पुरुषांकडून काहीही घेण्यास तयार नसल्यामुळे महिला कमावतात त्यामुळे घटस्फोटाच्या घटना वाढत आहेत.
पूर्वी ते कमावत नव्हते, त्यांना शिक्षण मिळत नव्हते आणि त्यांना जीवन जगावे लागत असे.
परंतु आता, काही महिला पुरुषांपेक्षा जास्त कमाई करत आहेत आणि परिस्थिती बदलत आहे.’

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.