क्राईम

बीड पोलीसांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश ! 3 कर्मरचाऱ्यांना दाखवली बाहेरची वाट

Beed Police's criminal nature exposed! Navneet Kavat takes a big decision

बीड : सायबर पोलिस ठाण्यातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश; 3 पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

बीड : प्रतिनिधी वेगवान मराठी केशव डी मुंडे 10 march 2025 Beed breking Police News wegwan Marathi  गतवर्षी  इ.स. 2024 मध्ये दाखल झालेल्या एका सायबर फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करत असताना, सायबर पोलिस ठाण्यातील तिघा पोलिस कर्मचाऱ्यांनी मोठा गैरप्रकार केल्याचे उघड झाले आहे.

यामध्ये उपनिरीक्षक रणजीत कासले, हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांचा समावेश आहे.

या प्रकरणात एका आरोपीला अटक करून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते.

मात्र, या तिघांनी त्याला खासगी वाहनाने गुजरात राज्यात नेले आणि तिथे कोट्यवधी रुपयांची डील केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्यानंतर उपनिरीक्षक रणजीत कासले यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते.

आता हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांच्यावर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या घटनेनंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तडकाफडकी कारवाई करत चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका दिला आहे.

त्यामुळे संबंधित पोलिस निरीक्षक देखील अडचणीत आले असून, त्यांच्या विरोधातही कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!