क्राईमबीड

अश्लिल फोटो ची भिती दाखवुण महिलेवर 3 वर्षे अत्याचार

Sugarcane cutter blackmails woman, tortures her for three consecutive years

बीड :माजलगांव येथील ऊसतोड मजुर दांपत्या कडे फिरलेल्या रक्कमे पोटी मुकदमा कडुण महिलेवर अनेक वेळा अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे,

वेगवान मराठी प्रतिनिधी दिनांक 10 मार्च 2025  शारीरिक संबंध ठेव नाही तर तुझ्या पतीला मारून टाकेल अशी धमकी देत दोन ते तीन वर्षांपासून माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका गावातील महिलेवर मुकादमाने अत्याचार केले.

तसेच अश्लील फोटो व्हायरल केल्याने महिलेने मानसिक व शारीरिक जाचास कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

दरम्यान, महिलेचा तक्रारीवरून अमोल श्रीमंत शिनगारे याच्या विरोधात दिंद्रुड पोलिसात गुरुवारी अत्याचार व ऍट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका गावातील ऊसतोड मजूर जोडपं अमोल श्रीमंत शिनगारे याच्याकडे ट्रॅक्टरवर कामाला होते,

दरम्यान दोन लाख रुपयांची बाकी त्यांच्याकडे शिल्लक राहिल्याने तुमच्याकडे असलेले पैसे दे अन्यथा माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव म्हणत अमोल शिनगारे याने जबरदस्तीने महिलेने अत्याचार केले. तसेच भेटायला ये अन्यथा फोटो व्हायरल करेल अशा धमक्या दिल्या.

दरम्यान,सात महिन्यांपासून महिला भेटण्यास टाळाटाळ करत असल्याने अमोलने महिलेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले.

शिनगारे याच्या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून पीडित महिलेने मंगळवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत.

गुरुवारी पीडित महिलेच्या तक्रारीवरून अमोल श्रीमंत शिनगारे याच्या विरोधात अत्याचारासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपी फरार असून दिंद्रुड पोलीस शोध घेत आहेत.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!