क्राईम

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटणा

A reprehensible incident in Nekanur, Beed district, that tarnishes the father-daughter relationship

 

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड दिनांक 16 एप्रील 2025  नेकनूर येथील पितृत्वाला कलंकित करणारी निंदनिय घटणा घडली आसुण सर्वत्र थु थु करण्यात येत आहे– जन्मदात्या पित्यानेच आपल्या स्वतः च्या अल्पवयीन अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी खेदजनक जनक घटना घडली आहे.

ही घटना नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात शुक्रवारी घडली

नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या एका गावातील दाम्पत्यामध्ये घरगुती कारणावरून वाद निर्माण झाले होते.

या वादातून आरोपीची पत्नी पुण्याला निघून गेली होती. तर मुलगी एकटी घरी होती.

शुक्रवारी रात्री राहत्या घरातच नराधम पित्याने पोटाच्या मुलीवर अत्याचार केला. सदरील प्रकार हा मुलीची आई पुण्यावरून आल्यानंतर समोर आला.

पिडीतेच्या आईने याबाबत आज नेकनूर पोलीस ठाण्यात जावून नराधम पित्या विरोधात तक्रार दाखल केली त्यानुसार आरोपीविरोधात बाल लैगिंक अत्याचार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सध्या नराधाम आरोपी नेकनूर पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेमुळे नेकनूर परिसरात खळबळ उडाली.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!