बीड मध्ये संतोष देशमुख नंतर आणखी एका भाजपा नेत्याच्या खुन
After Santosh Deshmukh, another BJP leader murdered in Beed

वेगवान मराठी प्रतिनिधी बीड- दिनांक 15 एप्रिल 2025 मंगळवार बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावर भाजप कार्यालयासमोर भाजपचे तालुका सरचिटणीस व पक्षाच्या विस्तारक बाबासाहेब प्रभाकर आगे (वय 30 वर्षे) यांची भर दिवसा हत्या करण्यात आली आहे त्यामुळे माजलगाव तालुक्यासह बीड जिल्हा पुन्हा एकदा भाजपा नेत्याच्या खुनामुळे हादरला आहे
मस्साजोग चे भाजपचे सरपंच व बुथप्रमुख संतोष देशमुख यांच्या निर्दयी हात्याकांडा नंतर परत एकदा सताधारी भाजपाच्या नेत्याची भर दिवसा क्रुर पद्धतीने हत्या होणे हे भाजपासाठी चिंताजनक बाब निर्माण झाली आसुण बीड जिल्ह्यातील भाजपाची झालेली दयणीय अवस्था यास काही अंशी कारणीभूत ठरु शकते आशी चर्चा आहे
आज मंगळवारी एका तरुणाने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोयत्याने सपासप वार करत आगेची हत्या केली. या घटनेनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात येऊन हजर झाला.
माजलगावमध्ये स्वामी समर्थ मंदिरा पाठीमागे भाजप कार्यालय आहे. या कार्यालयाच्या समोर भाजपच्या तालुका सरचिटणीस बाबासाहेब प्रभाकर हा उभा होता. तेथे नारायण शंकर फपाळ राहणार बेलूरा हा तरुण आला.
आणि त्याने आगे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात आगे हा रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.
त्याने हत्येची कबुली दिली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ माहिती घेत आहेत.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








