बीड

बाबा साहेब आगे यांच्या कुटुंबाचे पालकत्व पंकजा मुंडे यांनी घेतले

Minister Pankaja Gopinath Munde accepts guardianship of BJP Ajay's family in Majalgaon

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड दिनांक 17 एप्रिल २०२५ माजलगाव : भारतीय जनता पक्षाचे बीड लोकसभा मतदार संघ बुथ विस्तारक बाबासाहेब आगे यांच्या निर्घृण हत्येच्या पश्चात त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे पालकत्व जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी स्विकारले आहे.

बाबासाहेब आगे यांच्या हत्येने मन सुन्न झाले, एक धडाडीचा कार्यकर्ता मी गमावला आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

बाबासाहेब आगे यांची निर्घृण हत्या झाल्याची बातमी जेव्हा कानावर आली, ते ऐकून मन सुन्न झाले. काहीच सुचत नव्हते,

त्यामुळे एका दिवसानंतर ना. पंकजाताई मुंडे यांनी या घटनेवर आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

बाबासाहेब आगे हे भाजपचे धडाडीचे कार्यकर्ते होते, संघाचे संस्कार त्यांचेवर असल्याने प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव होता.

माझ्या लोकसभा निवडणुकीत बुथ विस्तारक म्हणून अतिशय महत्वाची जबाबदारी त्यांनी खूप मेहनतीने पार पाडली.

सक्रिय व मनमिळावू कार्यकर्त्याची अशा प्रकारे निर्घृण हत्या झाली हे ऐकून मनाला खूप वेदना झाल्या. या घटनेचा मी तीव्र स्वरुपात निषेध करते.

जिल्हयात आल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या पत्नी व कुटुंबाची भेट घेणार आसुण. त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखात माझा परिवार सहभागी आहे.

बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबाची जबाबदारी मी घेणार असून त्यांना सर्वतोपरी मदत करेल असं ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगीतले

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!