बीड नंतर परभणी येथील शिक्षक सोपान पालवे यांची आत्महात्या
After Beed, a teacher in Parbhani committed suicide due to harassment by the institution's principal.

बीड नंतर परभणी येथील शिक्षकाची संस्थाचालक आणि सचिवाच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याने शिक्षण क्षेत्रातील जिवघेणी वासत्व समोर येत आसुण संस्थाचालकांचा चेहरा उघडा पडत आहे…
वेगवान मराठी प्रतिनिधी परभणी 17 एप्रिल २०२५ परभणीच्या सेलू तालुक्यातील आडगाव दराडे येथील 35 वर्षीय तरुण सोपान पालवे यांनी आज परभणी तालुक्यातील आरपी रुग्णालयाच्या शेजारी एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आणि एक चिट्ठी ही त्यांनी लिहून ठेवली.
ज्यात ज्या शिक्षण संस्थेत ते काम करत आहेत तिथले सचिव बळवंत खळीकर यांनी सातत्याने त्यांचा कसा छळ केला. याबाबत त्यांनी लिहून ठेवले आहे.
भरती करतांना ३ एकर जमिन विकून त्यांनी 20 लाख रुपये खळीकर या सचिवाला दिले होते.
त्यानंतर टप्पा अनुदान वाढवण्यासाठी ही 5 लाखा मागणी करण्यात आली होती परंतु एवढे पैसे देऊनही त्याला वेळेवर पगार दिला जात नव्हता.
कधी 20% नि पैसे मिळायचे तर कधी मिळायचे नाही, त्यामुळे या त्रासाला कंटाळून पालवे सरांनी आत्महत्या केली
यानंतर परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात सचिव बळवंत खळीकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पालवे यांच्या कुटुंबियांकडून खळीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे .
या संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम चव्हाण व सचिव बळवंत खळीकर हे आहेत

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.