
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत पात्र कुटुंबाची सर्वेक्षण करुन ई- केवायसी पूर्ण करण्याच्या महाराष्ट्र शासणाच्या सुचना..
वेगवान मराठी प्रतिनिधी बीड, दि. 28 एप्रिल (केशव डी मुंडे जि.मा.का.) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत पात्र कुटुंबाची आवास प्लस 2024 सर्वेक्षण उपमहा निदेशक, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी दिनांक 4 एप्रिल 2025 रोजीच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये आवास प्लस 2024 सर्वेक्षण करताना पुढील बाबींच्या अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या आहेत.
राज्यातील सर्व 100 टक्के ग्रामपंचायत यांना सर्वेक्षकाचे मॅपिंग करून त्याची ई केवायसी 100 टक्के पूर्ण करणे, स्व: सर्वेक्षणाबाबत (Seif Survey) ग्रामपंचायत स्तरावर येथोचित जनजागृती करणे, आवास प्लस 2024 सर्वेक्षण पूर्ण करतांना तालुकास्तरावरून किमान 10 टक्के तपासणी (Cheking) करण्यासाठी तपासणी (Checker) म्हणून तालुक्यामध्ये कार्यरत विस्तार अधिकारी प्रर्यवेशक/ प्रर्यवेशिका, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता इत्यादी प्रकारच्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवड करणे.
निवडलेला तपासणीस (Checker) सर्वेक्षक (Surveyor) नसावा याची दक्षता घेणे. निवडलेल्या तपासणी (Checker) यांना किमान 10 टक्के सर्वेक्षित कुटूंबे तपासण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायत वितरण करुन त्या ग्रामपंचायतींना त्याचे मॅपिंग करुन घेणे त्यांची ई – केवायसी पूर्ण करणे. सर्वेक्षण केलेल्या कुंटुंबाची माहिती केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या परवानगीशिवाय कोठेही प्रकाशित न करणे.
वरील प्रमाणे दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून सर्वेक्षणाची कार्यवाही विहीत वेळेत पूर्ण करावी अशा सूचना संचालक ग्रामीण गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य यांनी दिल्या आहेत.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.