मुंबई येथील ईडी कार्यालयास आग ! उलट सुलट चर्चांना उधान
Fire breaks out at ED office in Mumbai! Causes controversy

राजकीय आणि उधोग क्षेत्रातील बड्या लोकांच्या भ्रष्टाचाराच्या फाईली जळुण खाक झाल्याची माहिती !
आग लागली की लावली या विषयी विविध क्षेत्रातील मान्यवरां कडुण संशय व्यक्त केला जात आहे ! या नेत्यांसह खालील उधोगपतींच्मा फाईलींचा या मध्ये समावेप्रकरणांचागवान मराठी प्रतिनिधी मुंबई दि.28 एप्रिल 2025 -सदरील घटणा हि रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे,सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयाला भीषण आग लागली. ही भीषण आग जवळपास 10 तास धुमसत होती. कार्यालय बंद असताना लागलेल्या आगीमुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत
या आगीत अनेक महत्त्वाच्या हायप्रोफाइल केसशी संबंधित फाइल्स, कागदपत्रे आगीच्या लोळात पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील बॅलार्ड इस्टेटमधील एका प्रायव्हेट मालकीच्या इमारतीत ईडीच्या झोन-१ कार्यालयास रविवारी पहाटेच्या सुमारास आग लागली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 10 तासांचा वेळ अग्निशमन दलाच्या जवानांना लागला होता
या भीषण आगीत काही हाय-प्रोफाइल प्रकरणांचे तपास रेकॉर्ड हरवले असल्याची भीती व्यकत करण्यात येत आहे
या हायप्रोफाइल केसमध्ये फरार उद्योगपती मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी तसेच राजकारणी छगन भुजबळ,नवाब मलिक आणि अनिल देशमुखांसह इतरही शिंदेसेना आणि आजीत पवार गटातील नेत्यांशी संबंधित प्रकरणांचा समावेश आसल्याचे वृत येत आहे…
यापुर्वी देखील जेंव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री आसताना अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले आसता पृथ्वीराज चव्हाण यांनी श्वेतपत्रीका काढण्याचे सुतोवाच केले होते तेंव्हा मंत्रालयातील जलसंपदा विभागास आग लागली होती ✒️ KESHAV D MUNDE 8888 387 622 WEGWAN MARATHI NEWS NETWORK .

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.