क्राईमबीड

गोळ्या औषधांचा वापर नशा करण्यासाठी विक्री करणारे रैकेट उघडकीस

The gang that used and sold medicine for addiction on Mediclass was exposed.

दि. 17/05/2025 :- नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषच आणि गोळया विकणाऱ्या रॅकेटचा बीड शहर पोलीसांकडून पर्दाफाश (चार आरोपींसह २,५४,०९७/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत)

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड काल दिनांक १६/०५/२०२५ शुक्रवार रोजी रात्री बीड शहर पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बीड शहरातील हाफीज गल्ली, जुना बाजार येथे नशेच्या गोळया व औषधे अनधिकृतपणे चोरीच्या मार्गाने विक्री करण्यात येत आहेत.

त्यावरुन दिनांक १६/०५/२०२५ रात्री ११.०० वा. च्या सुमारास वरिष्ठांच्या परवानगीने व मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलीसांनी पंच साक्षीदार तसेच फार्मासिस्ट यांच्यासह हाफीज गल्ली, जुना बाजार बोड येथे मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी एका जुन्या वाडयात छापा मारला असताना

तेथील घरातून चार इसम बाहेर येतांना दिसले. त्यांची नावे १) फैजानखान अस्लमखान पठाण, २) सोहेलखान युसुफखान पठाण, दोन्ही रा. हाफौजगल्ली, जुना बाजार बोड, शोएबखान ताजुद्दीनखान, रा. हत्तीखाना बीड, ४) शेख फिरोज शेख सादेक, रा. गिराम गल्ली कारंजा, बीड अशी असून

त्यांना पोलीस निरीक्षक श्री शितलकुमार बल्लाळ यांनी स्वतःचा परिचय देऊन तसेच योग्य ती कायदेशिर प्रक्रीया पूर्ण करुन सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्या पेंटच्या शिखांमध्ये नेशसाठी वापरण्यात येणान्या औषधांच्या बाटल्या तसेच गोळया मिळून आल्या.

त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री शितलकुमार बल्लाळ यांनी आरोपीतांना सदर घर कोणाचे आहे व तुम्ही सदरचे औषध व गोळया कुठे घेऊन चाललात असे विचारले असता सदरचे घर आजमखान गुल मोहम्मद खान, रा. हाफीज गल्ली, जुनाबाजार बीड यांचे असल्याचे सांगुन नमुद गुंगीकारक औषधाच्या बाटल्या व गोळयांची पाकीटे आम्ही लोकांना नशा करण्यासाठी विकतो असे सांगीतले.

तसेच सदर घरात जाऊन आरोपीतांनी एक जांभळ्या रंगाची गोणी पोलीसांना दाखविली. त्यामध्ये देखील गुंगीकारक औषधाच्या घाटल्या व गोळयांची पाकीटे तसेच रोख रक्कम मिळून आली.

सदर सर्व औषधाच्या बाटल्या व गोळयांची पाकीटे हि फार्मासिस्टच्या मदतीने तपासली असता सदर औषध व गोळयांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचा नशेसाठी वापर होऊ शकतो असे सांगीतले.

नमुद छापा कारवाईमध्ये खालील वर्णनाचा एकुण २,५४,०९७ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

१) Ethixelite कंपनीच्या Cod rite Cough syrup च्या १०० ml च्या ६६ बॉटल एकुण किंमत १३९९२/-

२) MPIOUS कंपनीच्या Alprazolam प्रत्येकी १५ Tablets असलेल्या १३५ स्ट्रीप एकुण किंमत ५५३५/-

३) चार विविध कंपन्याचे जुने वापरते मोबाईल फोन एकुण किंमत १,६३,०००/-

४) एक होंडा शाईन कंपनीची जुनी वापरती मोटारसायकल किंमत अंदाजे ६०,०००/-

५) तसेच आरोपीचे घरात एका गोणीत मिळून आलेली रोख रक्कम ११,९७०/- रुपये,

सदर प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला असून वरील चार आरोपीतांना अटक करण्यात येऊन त्यांना आज न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपी क्र. १ व २ यांना तीन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली

व इतर दोघांची न्यायालयीन कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री शितलकुमार बल्लाळ हे करीत आहेत.

मागील सहा महिण्याच्या काळात बीड शहर पोलीसांची ही दुसरी कामगीरी असून मा. पोलीस अधिक्षक श्री नवनीत काँवत यांच्या सुचनेप्रमाणे नशेच्या गोळ्या व औषध विक्री व त्यातूनच वाढणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उचलण्यात आलेले कठोर पाऊल आहे.

सदरची कामगीरी मा. श्री नवनीत कौवत, पोलीस अधिक्षक बीड, मा. श्री सचिन पांडकर, अप्पर पोलीस अधिक्षक बीड, श्री विश्वंभर गोल्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे बीड शहर येथील पोलीस निरीक्षक श्री शितलकुमार बल्लाळ, पोलीस अंमलदार सचिन अलगट, जयसिंग वायकर, सुशेन पवार, मिरा रेडेकर, मनोज परजने, अश्फाक सय्यद, माने यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

( प्रति, संपादक-वेगवान मराठी बीड केशव डी मुंडे ,दैनिक,पोर्टल,वेबसाईट,पोलीस अधीक्षक बीड,करीता )

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!