क्राईमबीड

अखेर राजस्थानी मल्टिस्टेट वर लिक्विडेटर नियुक्त ! ठेवीदार कृती समितीच्या लढ्याचे यश

Appointment of liquidator for Rajasthani Multistate Credit Society

सामाजीक कार्यकर्ते सेवकराम जाधव यांच्या लढ्याचे यश दृष्टीक्षेपात ! गरजवंत ठेवीदारांच्या आशा पल्वित झाल्या !

ज्या कामाची अपेक्षा आमदार मंत्र्याकडुण केली ति सेवकराम जाधव यांनी मुठभर सैनिकांना सोबत घेऊण पुर्ण केली

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे परळी-बीड दिनांक-19 मे 2025 -महाराष्ट्र शासनाच्या सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी पत्र क्रमांक EST/D-2/राजस्थानी को-ऑप/श्री.मोटे/लिक्वि./2025/1815 दिनांक 29.04.2025 द्वारे शिरूर कासार, जि. बीड येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांची संस्थेच्या विमोचकपदी नियुक्तीसाठी शिफारस केली आहे.

त्यामुळे, वरील बाबींचा काळजीपूर्वक विचार करून, मी, रवींद्र कुमार अग्रवाल, सहकारी संस्थांचा केंद्रीय निबंधक, बहु-राज्य सहकारी संस्था अधिनियम, 2002 च्या कलम 86 अंतर्गत मला प्राप्त अधिकारांचा उपयोग करून,

राजस्थानी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, लक्ष्मी मार्केट, डॉ. वांगीकर हॉस्पिटलजवळ, परळी, वैजनाथ, जिल्हा बीड, महाराष्ट्र (राष्ट्रमाता जिजाऊ पुतळा, सेंट्रल रोड, बीड, महाराष्ट्र समोर)” या संस्थेच्या विघटनाचा आदेश देत आहे.

आणि मी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर कासार, जि. बीड यांची संस्थेचे विमोचक म्हणून कलम 89(1) अंतर्गत पुढील आदेशापर्यंत नियुक्ती करीत आहे,

तसेच अधिनियम व नियमांनुसार आवश्यक ती पुढील कारवाई करण्याचे निर्देश देत आहे.

विमोचकास संस्थेच्या लिक्विडेशन प्रक्रियेत झालेल्या प्रगतीचा अहवाल तिमाही आधारावर या कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील.

—माझ्या सही आणि शिक्क्यानिशी हे आदेश दिनांक 16 मे 2025 रोजी जारी केले गेले..

( रवींद्र कुमार अग्रवाल केंद्रीय निबंधक, सहकारी संस्था )

प्रेषन यादी 👇

1. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर कासार, जि. बीड, महाराष्ट्र शासनाचे सहकार आयुक्त व निबंधक, दुसरा मजला, न्यू सेंट्रल बिल्डिंग, आंबेडकर वेलसली रोड, पुणे – 411001

2. अध्यक्ष/मुख्य कार्यकारी अधिकारी, राजस्थानी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, लक्ष्मी मार्केट, डॉ. वांगीकर हॉस्पिटलजवळ, परळी, वैजनाथ, जिल्हा बीड

3. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन, दुसरा मजला, न्यू सेंट्रल बिल्डिंग, आंबेडकर वेलसली रोड, पुणे – 411001

4. निबंधक, सहकारी संस्था, कर्नाटक शासन
5. कार्यालयीन संकेतस्थळावर ही नोटीस अपलोड करण्यासाठी IT सेल

( चौकट -)

राजस्थानी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी दिवाळखोरीत निघाल्या नंतर ठेवीदारांना दुसरा धक्का बसला तो स्थानिक लोकप्रतिनिधी कडुण आणि राजकीय पुढाऱ्यांकडुण मदत तर सोडा पण आधार पण दिला नाही उलट ठेवीदारांचे मनोधैर्य खच्ची करणाचे प्रयत्न जाणीव पर्वक करण्यात आले…

परंतु ठेवीदारांनी धिर न सोडता ठेवीदार कृती समितीची स्थापना केली आणि स्वताच्या बळावर लढा लढण्याचा एकमुखी निर्णय मंजुर करण्यात आला.

.ठेवीदार कृती समिती च्या पदाधिकाऱ्यांना अडचणीत आनण्यासाठी अनेक प्रयत्न झाले अनेकदा वेगवेगळ्या पातळीवर संघर्ष करावा लागला,प्रशासकीय ऊंबरे झिजवावे लागले,

धमक्या देऊण बघितल्या आमिष दाखवून बघितले गुंडांचा वापर करुण पाहिला परंतु ठेवीदारांची परस्थिती जवळुण अनुभवल्यामुळे दबावाला आणि कसल्याही प्रकारच्या अमिषाला भिक न घालता कृती समितीने मान आपमान व संकटांना झेलत, सहन करत, लढा आधिक तिव्र केला ,

तुकाराम नागरगोजे यांनी बनवलेल्या whatsapp ग्रुपच्या माध्यमातुन ठेवीदारांच्या ओळखी झाल्या आणि याच माध्यमातुन लढ्याला खरी सुरुवात झाली..

सर्वांनी झिडकारले परंतु आमदार सुरेश आण्णां धस यांनी मात्र ठेवीदारांना स्विकारले..

आमदार सुरेश आण्णां धस यांनी या लढ्यातील एक अवघड टप्पा पुर्ण करुण दिला जो स्थानिक लोकप्रतिनिधी कडुण व्हायला पाहीजे होता .याच बरोबर काही मोजक्या पत्रकारांनी देखील ठेवीदारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य केले..

आता -लिक्विडेटर चे कार्य संपताचा प्रशासक येईल आणि ठेवीदारांच्या हाता मध्ये त्यांच्या हक्काया ठेवी येथील हि आशा पल्वित झाली आहे 

 

© लिक्विडेटर चे आधिकार आणि कार्य   ©

कर्ज, ठेवी याचा लेखा जोखा करणे,

ऑडीट करणे, कर्जभरण्यासाठी कर्जदारांना वकीला मार्फत कायदेशीर नोटीस बजाविणे,

सॉफ्टवेअर ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आसुण,कर्ज वसुलीस सुरुुवात होणार आहे 

✒️ वेगवान मराठी न्युज नेटवर्क परळी महाराष्ट्           केशव डी मुंडे 8888 387 622

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!