
दिनांक 07.06.2025 रोजी परळी येथील हातभट्टीच्या आक्काची हर्सुल जेल मध्ये रवानगी
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे परळी वै.जि.बीड
(MPDA कायद्याअंतर्गत हातभट्टीचे दारुचा चोरटा व्यापार करणाऱ्या इसमाची हसुल कारागृहात रवानगी)
बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी जिल्हयाची धुरा सांभाळल्या पासुन शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत त्यांना बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. विवेक जॉन्सन यांची खंबीर साथ लाभली आहे.
बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे व गुन्हेगारीचे व वाळु माफीयांचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून MPDA कायद्या अंतर्गत बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे.
त्या अनुषधांने पोनि पो.स्टे. संभाजीनगर परळी वै. यांनी दिनांक 12.05.2025 रोजी इसम नामे रघुनाथ शिवाजी राठोड वय 60 वर्षे रा. धारावती तांडा ता. परळी जि.बीड याचे विरुद्ध MPDA कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बोड यांना सादर केला होता.
सदर स्थानबध्द इसमा विरुद्ध पोलीस ठाणे संभाजीनगर परळी येथे हातभट्टीची दारू जवळ बाळगणे, चोरटी विक्री करणे, अवैध दारुची वाहतुक करणे वगैरे स्वरुपाचे 08 गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. सर्व गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत.
सदरील इसम हा हातभट्टीच्या दारुचा बोरटा व्यापार करीत असल्याने पोलीसांची त्याचेवर बऱ्याच दिवसांपासून करडी नजर होती. सदर इसम हा पोलीसांची नजर चुकवुन हातभट्टीच्या दारुचा चोरटा व्यापार करीत होता.
सदर इसमावर यापूर्वी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 93 प्रमाणे 02 वेळा प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती.
परंतु सदर इसम हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता पुन्हा जोमाने हातभट्टीची दारू ताब्यात बाळगुन तिची चोरटी विक्री करण्याचे गुन्हे करण्याचे चालुच ठेवुन होता.
त्यामुळे पो.स्टे. संभाजीनगर हद्दीत व परळी शहरात व परिसरातील सर्वसामान्य नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता.
सदर प्रकरणात श्री. विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिनांक 03.06.2025 रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुध्यवस्था अबाधीत राहावी हा उदाक्त दृष्टीकोन डोळयासमोर ठेऊन
सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्मुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबध्द करणे बाबत आदेश पारीत केले होते.
त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना पोनि संभाजीनगर परळी वै. व पो.नि. स्थागुशा बीड यांना दिल्या होत्या.
सदर आदेशावरुन पो.नि. स्थागुशा यांनी ताबे पोलीस अंमलदार यांचे मार्फत सदर इसमास दिनांक 07.06.2025 रोजी ताब्यात घेऊन पो.स्टे. संभाजीनगर परळी येथे हजर केले,
पो.नि. संभाजीनगर यांनी सदर इसमास दिनांक 07.06.2025 रोजी 07.29 वा. कायदेशीररीत्या ताब्यात घेऊन योग्य पोलीस बंदोबस्तात हसुल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे स्थानवध्द करणे करीता रवाना केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कौवत, अपोअ अंबाजोगाई श्री. चेतना तिडके, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री शिवाजी बंटेवाड स्थागुशा बीड, पो.नि. धनंजय ढोणे, पोउपनि अनिल शिंदे, पोह नरहरी नागरगोजे, मनोज घुगे, सर्व पो.स्टे. संभाजीनगर परळी वै.
यांचेसह, पोउपनि सुशांत सुतळे, सपोउपनि अभिमन्यु औताडे, विष्णु सानप, सचिन आंधळे, मारुती कांबळे, अधिन सुरवसे बिबीषण चव्हाण नेमणुक स्वागुशा बीड यांनी केलेली आहे.
भविष्यातही वाळूचा चोरटा व्यापार करणारे, अवैध गुटका विक्री करणारे तसेच जिवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती व जातीय तथा धार्मीक तेढ निर्माण करणारे समाजकंटक
यांचेवर व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहाद्दर धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त MPDA कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉक्त यांनी दिले आहेत.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








