
संगमेश्वर येथून करजुवे वस्तीची बस घेऊन गेले होते. बुधवारी सकाळी 6.15 वाजता ही बस करजुवे येथून प्रवासी घेऊन संगमेश्वरकडे जात होती.
वेगवान मराठी बीड-प्रतिनीधी- दि 20 / फेब्रुवारी 2025 – भायजे वाडी मार्गे घारेवाडी येथे वाहक तुकाराम माने चक्कर येऊन खाली पडल्याचे एका प्रवाशाने बसचालकाला सांगितले.
चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी करून तुकाराम माने यांच्याकडे विचारपूस केली आसता अस्वस्थ वाटत असल्याचे आणि छातीत दुखत आसल्याचे माने यांनी सांगितले.
चालक कोपनर यांनी वेळ न घालवता व प्रवाशांची मदत घेत थेट संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाकडे बस नेली. तेथे वाहकाला उपचारासाठी दाखल केले.
मात्र तोवर तुकाराम याची प्राणज्योत मालवली होती.
देवरुख आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे, स्थानक प्रमुख कैलास साबळे तसेच अनेक चालक वाहकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली.
अंबाजोगाई तालुक्यातील जोडवाडी गावच्या तुकाराम कुंडलिक माने या बस वाहकाचा करजुवे — देवरुख या दरम्यान चालत्या गाडीतच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली
काही वाहक आणि चालकांना अश्रू अनावर झाले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे
बीड जिल्ह्यातील तुकाराम माने हे २०१८ साली वाहक कम चालक म्हणून देवरुख आगारात रुजू झाले होते. दोन मुलगे आणि पत्नीसह ते देवरुखमध्ये राहतात. अन्य कुटुंब बीड जिल्ह्यातील मूळ गावी वास्तवास आहेत

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.