बीड ब्रेकींग-DR.हनुमंत डोईफोडे यांचे अपघाती निधन
Accidental death of Dr. Hanumant Doifode from Kasari

बीड जिल्ह्यातल्या डाॅ.हनुमंत डोईफोडे यांचे उल्हासनगर येथे अपघाती निधन झाल्याचे वृत कासारी गावात शोककळा ….
वेगवान मराठी केज प्रतिनिधी दिनांक 24 फेब्रुवारी 2025 – मूळ कासारी (ता. केज) येथील आणि सेंट्रल हॉस्पिटल, उल्हासनगर येथे कार्यरत असलेले डॉ. हनुमंत बाबुराव डोईफोडे (वय ३२) यांचे अपघाती निधन झाले.
रविवारी (दि. २३) दुपारी हिराघाट (उल्हासनगर-३) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते
छातीला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
मात्र उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ.डोईफोडे यांच्या निधनाने कासारी गावावर शोककळा पसरली असून त्यांच्या पार्थिवावर आज (दि. २४) दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात डॉक्टर पत्नी, आठ महिन्यांचा मुलगा आणि कुटुंबीय आहेत.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.