बीड

पावसाळ्यासाठी आपत्कालीन यंत्रणेचा विवेक जॉन्सन यांचा मेगा प्लैन

Vivek Johnson's mega plan for monsoon preparedness and disaster management

 !! मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष सुरु,जिल्ह्यातील जनतेसाठी हेल्पलाइन !!

!! २४ तास यंत्रना सेवेत तत्पर राहणार !! जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा मॉन्सून पुर्व मेगा प्लैन 

  बीड दि. 28 ( केशव डी मुंडे वेगवान मराठी प्रतिनिधी ) बीड:- यंदा मान्सूनचे आगमन नेहमीपेक्षा लवकर झाले आहे आणि पावसाचे प्रमाण अधिक आहे. येणाऱ्या काळात हे प्रमाण जादा राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या काळात आपत्कालीन परिस्थितीत मदती करिता जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. 24 तास सुरू राहणाऱ्या या नियंत्रण कक्षाचा क्रमांक 02442-299299 हार्दिक आहे.

नागरिकांना या  क्रमांकावर मदतीसाठी कॉल करता येईल असे जिल्हा प्रशासना करते कळविण्यात आले आहे.

यासंदर्भात जारी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे की,

जिल्हा प्रशासनामार्फत मान्सुन 2025 पुर्व तयारी अनुषंगाने संबंधित यंत्रणांना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत-

पूर्वतयारी (Pre-Flood Preparedness):

•           धोक्याची पूर्वसूचना देणे: हवामान खात्याच्या माहितीवरून नागरिकांना त्वरित इशारा देणे (SMS, ध्वनी प्रणाली, ग्रामसेवक/पोलीस मार्फत).

•           आपत्ती व्यवस्थापन पथके तयार ठेवणे: NDRF, SDRF, स्थानिक होमगार्ड्स, आरोग्य सेवक, पोलीस आदींची पथके सज्ज ठेवणे.

•           सुरक्षित ठिकाणांची निवड: शाळा, पंचायत कार्यालय, मंदिरे यांसारखी सुरक्षित उंच ठिकाणे निवडून तिथे नागरिकांना हलवण्याची योजना तयार ठेवणे.

•           वाहतूक व्यवस्था: मुख्य रस्त्यांवर आणि पूरप्रवण भागांत वाहतूक नियंत्रित ठेवणे.

______________

पूरस्थितीत तातडीची कार्यवाही (Emergency Response):

•           लोकांचे स्थलांतर: पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे. वृद्ध, महिला, लहान मुले यांना प्राधान्य.

•           आपत्ती निवारण केंद्र उभारणे: अन्न, पाणी, औषधे, शौचालय व विश्रांती यांची सोय असलेली केंद्रे उभारणे.

•           आपत्कालीन आरोग्य सेवा: प्राथमिक उपचार केंद्र उभारणे, रुग्णवाहिका सज्ज ठेवणे.

•           बचाव कार्य: जलद बचाव कार्यासाठी बोटींनी आणि गोताखोरांच्या साहाय्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे.

______________

पूरानंतरची कार्यवाही (Post-Flood Recovery):

•           सफाई व निर्जंतुकीकरण: पाण्याचा निचरा झाल्यानंतर गावाची सफाई व रोगप्रतिकारक उपाय (फवारणी, पिण्याच्या पाण्याची तपासणी).

•           आरोग्य तपासणी: साथीचे रोग पसरू नयेत म्हणून मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.

•           सरकारी मदतीचे वितरण: नुकसान भरपाई, अन्नधान्य, निवारा, कपडे यांचे वितरण.

•           वित्तीय मदत: घरांचे नुकसान, शेतीचे नुकसान, जनावरांचे मृत्यू याबाबत नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू करणे.

______________

इतर उपाययोजना:

•           स्थानिक लोकांशी समन्वय: सरपंच, ग्रामसेवक, युवक मंडळ, स्वयंसेवी संस्था यांच्याशी सहकार्य करून कार्यवाही करणे.

•           माहिती संकलन व अहवाल: नुकसानाचा अंदाज घेऊन जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करणे. आधी सर्वांसाठी शासन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर नियंत्रण कक्ष 02442-299299 स्थापन करण्यात आले असून नागरिकांनी आपत्कालीन स्थितीमध्ये संपर्क करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!