
चोरीच्या सात मोटार सायकली पकडल्या, पाच गुन्हे उघड – स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
मा.पोलीस अधीक्षक बीड यांनी बीड जिल्हयामध्ये होणाऱ्या मोटर सायकल चोरीच्या गुन्हयामध्ये वाढ झाल्याने मोटर सायकल चोरीचे गुन्हे जास्तीत जास्त उघडकीस आनण्याचे सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या…

(वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे- बीड)-त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेनेशर्थीचे प्रयत्न सुरु केले होते. दिनांक 30/05/2025 रोजी पोलीस हवालदार भागवत शेलार यांना माहीती मिळाली की , अंबाजोगाई शहरातुन चोरी गेलेल्या गाडया तळेगांव शिवारामध्ये घरामध्ये विक्रीसाठी ठेवल्या असुन त्याची डिल होणार आहे.
या बातमीवरुन स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोउनि सिध्देश्वर मुरकुटे व पथकाने तळेगाव येथे छापा मारला असता, आरोपी शेख ईलियास शेख गफार, वय 25 वर्ष, रा तळेगांव ता.जि बीड. हा चोरीच्या गाडयासह मिळाला.
आरोपीकडुन एकुण 07 मोटार सायकली तपासकामी जप्त केल्या.त्या मोटार सायकली अंबाजोगाई, जालना, छत्रपती संभाजीनगर येथुन चोरल्याचे आरोपीने सांगीतले.आरोपीकडे मिळुन आलेल्या मोटार सायकलींचे वर्णन खालीलप्रमाणे
अ.क्र प्रकार व कंपणी रंग चेसीस नंबर दाखल गुन्हे
1) होडा ड्रिम युगा काळया रंगाची ME4JC558AEGT27030 अंबाजोगाई शहर 179/2024 कलम 379 भा.दं.वि
2) हिरो स्प्लेंडर प्लस काळी सिल्वर पट्टा MBLHAR087J5F00402 अंबाजोगाई शहर 298/2023 कलम 379 भा.दं.वि
3) हिरो HF DELUXE सिल्वर रंगाची MBLHAR206H5D01035 तालुका जालना 147/2025 क 303(2) BNS
4) हिरो HF DELUXE लाल रंगाची MHLHAR209JGF14166 बेगमपुरा छ.संभाजीनगर 56/2025 क 303(2) BNS
5) हिरो सिबी शाईन काळी लाल सिल्वर पट्टा ME4JC65AKJ7218187 बेगमपुरा छ.संभाजीनगर 61/2025 क 303(2) BNS
6) होंडा सिबी शाईन काळया रंगाची ME4JC653HG7013628 अभिलेख मिळुन आला नाही
7) होंडा सिबी शाईन काळया रंगाची ME4JC36JDD7390939 अभिलेख मिळुन आला नाही.
आरोपीकडुन एकुण 05 चोरीचे गुन्हे उघडकीस आले.असा एकुण 07 मोटार सायकली किं.अं 6,00,000/- मुद्देमाल जप्त केला आहे.
वर मिळुन आलेल्या मोटार सायकली मुळ मालकांनी संबधीत पोलीस ठाणेशी संपर्क साधुन घेवुन जाव्यात.
सदरील कारवाई हि श्री नवनित काँवत, पोलीस अधीक्षक,बीड, श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक,बीड,
श्रीमती चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक,अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली श्री उस्मान शेख, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा बीड, पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर मुरकुटे, पोलीस हवालदार
भागवत शेलार, विकास राठोड, दिपक खांडेकर, राहुल शिंदे, नितीन वडमारे, विकी सुरवसे, सुनिल राठोड, मच्छिद्र बीडकर यांनी केलेली आहे.
प्रती – वेगवान मराठी बीड keshav D Munde 8888 387 622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








