बीडराजकारणशेती

ऊसतोड महिलांच्या गर्भाशयाच्या बातम्या फेक ! वेगवान मराठी च्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब

Fake news about sugarcane harvesting women's uterus! Fake news of fake reporting has spread

बीडच्या पत्रकारांचा खोडसाळपणे केलेला अताताईपणा झाला उघड आणि आसे फुटले बिंग 

गर्भाशय शस्त्रक्रिया झालेल्या ऊसतोड कामगार महिलांची संख्या चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे बीडचे वैधकीय शल्यचिकित्सा संजय राऊत यांनी स्पष्ट केले 

वेगवान मराठी वगळता बीड जिल्ह्यातल्या सर्व मिडीयाने या खोट्या वृतास प्रसारीत केले होते.त्यामुळे वेगवान मराठी या मिडीया नेटवर्क च्या विश्वासाहर्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे 

( बीड दि.3 जुन- वेगवान मराठी केशव डी मुंडे ):-  बीड जिल्ह्यामध्ये 843 महिलांची गर्भपिशवी काढली यात तीस ते पस्तीस वयोगटातील 477 महिला असल्याची बातमी काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली आहे ही बातमी चुकीच्या माहितीवर आधारित असून याबाबत वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे.

सन 2024 मध्ये एक जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत संपूर्ण वर्षभरात बीड जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये 527 गर्भाशय शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

यात गर्भाशय शस्त्रक्रिया केलेल्या एकूण ऊसतोड महिला कामगारांची संख्या केवळ 8 इतकी आहे.

याच एक वर्षाच्या कालावधीत खाजगी रुग्णालयांमध्ये 656 गर्भाशय शस्त्रक्रिया झाल्या तर 22 प्रकरणी शस्त्रक्रिया नाकारण्यात आल्या यातील एकूण ऊसतोड कामगार महिलांची संख्या 55 इतकी आहे

आणि या दोन्ही गटात वय वर्ष 35 व त्याखालील ऊसतोडीस जाणाऱ्या एकूण महिलांची संख्या 0 इतकी आहे असा लेखी खुलासा बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी केला आहे.

चालू वर्षात 1 जानेवारी 2025 ते 31 मे 2025 या पाच महिन्यांच्या कालावधीत शासकीय रुग्णालयात झालेल्या गर्भाशय शस्त्रक्रियांची संख्या 98 आहे

यात ऊसतोड कामगार महिला किंवा वय वर्ष 35 व त्याखालील ऊसतोड कामगार महिला यांची संख्या देखील 0 इतकी आहे.

याच पाच महिन्यांच्या कालावधीत खाजगी रुग्णालयांमध्ये 268 शस्त्रक्रिया झाल्या तर सहा शस्त्रक्रिया नाकारण्यात आल्या,

यात गर्भाशय शस्त्रक्रिया केलेल्या ऊसतोड महिला कामगारांची संख्या 52 इतकी आहे व त्यातील केवळ एक ऊसतोड कामगार महिला 35 वर्षे वयाखालील असल्याचेही या लेखी खुलाशात म्हटले आहे.

हा विषय अत्यंत संवेदनशील विषय असून याचे गांभीर्य लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांपूर्वी याबाबत शस्त्रक्रिया कशा पद्धतीने होतील याची कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिकृतपणे कोणतीही माहिती न घेता कोणी वृत्त देत असेल तर त्यास प्रसिद्धी देऊ नये असे आवाहन देखील याद्वारे करण्यात येत आहे.

✒️ वेगवान मराठी न्युज नेटवर्क बीड -केशव डी मुंडे 8888 387 622 ✅

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!