ठाकरे पवारांना सहानुभूती, पंकजा मुंडे सुनेत्रा पवार आणि मी निवडून येणार…
ठाकरे पवारांना सहानुभूती, पंकजा मुंडे सुनेत्रा पवार आणि मी निवडून येणार...

वेगवान मराठी / अरुण थोरे
मुंबई, ता. 23 –
बॅंकेतील एफडी खोट्या! बॅंकेतील एफडी निघाल्या बोगस ! तुम्ही पण एफडी केलीयं का ?? video
राज्यात उद्धव ठाकरे व शरद पवारांना सहानुभूती आहे, मात्र बीडमधून पंकजा मुंडे बारामतीतून सुनेत्रा पवार आणि परभणीतून मी निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, अशी प्रतिक्रिया परभणी मतदार संघाचे उमेदवार व रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली आहे.
पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी राजकारण ते पोलीसा पर्यंत सारवासारव
ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले की मी राज्यात ५५ सभा घेतल्या असून, राज्यात महायुतीच्या ४८ पैकी ४२ जागा निवडून येतील, असे भाकीत करत असताना, परभणी व बीड मतदार संघात मोठ्या प्रमाणात ओबीसी व मराठा जातीयवाद झाला या जातिवादाला महाविकास आघाडीने खतपाणी घालण्याचे काम केल्याची प्रतिक्रिया जाणकार यांनी दिली.
ठाकरे पवारांना सहानुभूती, पंकजा मुंडे सुनेत्रा पवार आणि मी निवडून येणार…
राज्यात शरद पवार व उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीची लाट जरी असली तरी राज्यात महायुती ४२ जागा जिंकतील असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला. पंकजा मुंडे व माझ्या मतदार संघात जाणीवपूर्वक जातीयवाद करून मराठा व ओबीसी वाद लावून देण्यात आला, व मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र बारामती मधून सुनेत्रा पवार आणि बीड मधुन पकजा तर परभणीतून मी निवडून येणार असेही जाणकर यांनी ठासून सांगितले.








