क्राईमबीडमहाराष्ट्र

ठेवीदार कृती समितीचा दणका ! माऊंट लिट्रा शाळेला प्रशासकाची नोटीस

Show cause notice issued to Ashok Jain's Mount Litra School in response to Rajasthani Depositors Action Committee's demand

राजस्थानी पतसंस्थेच्या प्रशासका कडुण जैनांच्या अशोक वाटीके तील माऊंट लिट्रा च्या प्रिंसिपलास कारणे दाखवा नोटीस….

!! ठेवीदार कृती समिती ने प्रशासकास दिले होते चौकशी लावण्यासाठी चे पत्र ! आणि केला होता पाठपुरावा !!

आज दिनांक 9 जुन रोजी ए आर औफीस मध्ये बसुण कृती समिती ने कारवाई करण्यास भाग पाडले…

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे -9 जुन 2025 परळी-राजस्थानी ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या मागणीला यश*राजस्थानी मल्टी स्टेट घोटाळा प्रकरणी अध्यक्ष चंदूलाल बियाणी हे अटक असून सचिव बद्रीनारायण बाहेती हे दीड वर्ष झाले फरार आहेत.दोघेही परळी मधे नसल्याचा फायदा घेत जैनांच्या अशोका सह काही महाभागांनी बियाणी व बाहेती यांच्या मालकीची राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पोद्दार लर्न स्कुलच्या जागेवर आपला अधिकार गाजवत आहेत

हि जागा माझीच असून या मालमतेचा मिच मालक आहे हे दाखवण्याचा केविलवाणा व निच प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

वास्तविक राजस्थानी नागरी सह.पत संस्थेवर कायदेशीर दृष्टीने रीतसर प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे. प्रशासकाच्या वतीने सदरील मालमत्तेवर पत संस्थेचा बोजा पडलेला आहे.

म्हणून त्या जागेचा मालक असल्याचा दावा कोणीही करू शकत नाही. कोणी विक्री करू शकत नाही , कोणी भाड्याने देऊ शकत नाही.

सदरील जागा भाड्याने देणे घेणे करायचेच असेल तर त्या जागेचे भाडे प्रशासकाच्या खात्यावरच जमा करावे लागेल.

अशा स्वरूपाची मागणी राजस्थानी ठेवीदार कृती समितीने राजस्थानी पत संस्थेच्या प्रशासकाकडे केली होती.

त्या मागणीची दखल घेत पोद्दार स्कुलच्या जागेवर सुरु झालेल्या माउंट लिट्रा स्कुलच्या प्रचार्यास आज प्रशासकाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

ठेवीदारांचा शेवटचा रुपया मिळेपर्यंत हा लढा कायम सुरूच राहील असे राजस्थानी ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने ठणकाण्यात आले आहे.

©काय म्हटले आहे कारणे दाखवा नोटीस मध्ये पहा 👇….

प्रशासकीय समिती अध्यक्ष, राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. परळी वै, ता. परळी वै, जि.बीड तथा मुख्य लिपीक संलग्न सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था ता. परळी वै, जि.बीड

नोंदणी क्रमांक बीएचआर/एआयजे/आर.एस.आर/ओ/525/89 दि.30.12.1989 – संस्थेचा पत्ता- लक्ष्मी मार्केट पहिला मजला परळी वे 431515

एस के चव्हाण, प्रशाकीय समिती अध्यक्ष, संलग्न सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था ता.परळी मोबाईल क्र. 9404903634/9975703634 प्रा.स.स. राजस्थानी नागरी पत/2025 नागरी सह दि-9/06/2025

प्रती नोटीस- प्राचार्य माऊंट लिट्रा झी, स्कुल परळी वै. जि. बीड

विषय – (सर्वे नं. 90) यावर राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्थेचा बोजा असून सदरील जागेवर राजस्थानी पोद्दार स्कुल चा बोर्ड काढून आपण मांऊंट लिट्रा झी, स्कुलचा बोर्ड कशाच्या आधारावर लावला आहे याबाबत तात्काळ खुलासा सादर करणे बाबत

संदर्भ :- 1 मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, त्ता परळी वै, जि बीड यांचे कार्यालयी आदेश जा.क्र.सनिप प्रशासन/रानाप/कलम 77/बदल/1/2025 दि.03/01/2025.

2. मा. जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग सहकारी संस्था बी ड कार्यालीन पत्र जा.क्र 242 दि.01/10/2024.

३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.57/2024 दि. 07/01/2025 रोजीचे पत्र.

4. राजस्थानी ठेवीदार संघर्ष कृती समिती, परळी वे, यांचे पत्र दि.09/06/2025.

•!! उपरोक्त विषयाचे कृपया अवलोकन व्हावे !!•

2/-राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. परळी वे, ता. परळी वै, जि.बीड ही संस्था बंद पडल्यामुळे व ठेवीदारांच्या तक्रारी प्राप्त होत असल्यामुळे मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता.परळी वै, जि.बीड

यांचे आदेशान्वये राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. परळी वै, ता.परळी वै, जि.बीड या संस्थेवर माझी प्रशासकीय समिती अध्यक्ष म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे.

तथापी राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. परळी वे, ता. परळी वै, जि.बीड श्री. बियाणी चंदूलाल मोहनलाल हे संस्थेचे अध्यक्ष होते तसेच ते राज्यस्थानी मल्टीस्टेट को-ऑफ परळी वै, ता. परळो वे, जि.बीड या संस्थेवर अध्यक्ष आहे.

राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. परळी वै, ता. परळी वे, जि.बीड या पतसंस्थेचे दि.01/04/2022 ते 31.03.2024 च्या लेखापरीक्षण अहवालानुसार नियमबाहय गुंतवणूक रु.9,42,46,060.00 (अक्षरी नऊ कोटी बेचाळीस लाख सेहचाळीस हजार साठ रुपये) केलेली आहे

असे संदर्भ क्र.02 अन्वयेच्या लेखापरीक्षणात नमूद केलेले आहे. त्यामुळे संदर्भ क्र. 03 अन्वये सदर व्यक्तीच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आलेला आहे.

त्याअनुषंगाने, आपणास कळविण्यात येते की, चंदुलाल मोहनलाल बियाणी व बद्रीनाराण बाहेती यांची मालमत्ता (सर्वे नं. 90) यावर राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्थेचा बोजा असून सदरील जागेवर राजस्थानी पोहार स्कूल चा बोर्ड काढून आपण मांऊंट लिट्रा झी स्कूलचा बोर्ड कशाच्या आधारावर लावला आहे.

याचा तात्काळ लेखो पुराव्यानिशी खुलासा करावा अन्यथा उचीत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी,

या कामी विलंब झाल्यास किंवा भविष्यामध्ये काही प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची कृपया नोंद घेण्यात यावी. (सोबत संदर्भ क्र. 04 ची प्रत.)

(एस के चव्हाण -प्रशासकीय समिती अध्यक्ष  राजस्थानी नागरी पतसंस्था मर्यादित परळी वै.ता.परळी वै.जि.बीड)

प्रत-1. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांना माहितीस्तव सविनय सादर

2. मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ता. परळी वै, जि.बीड यांना माहितीस्तव सविनय सादर

3. राजस्थानी ठेवीदार संघर्ष कृती समिती, परळी वै, यांना माहितीस्तव,

✒️ वेगवान मराठी न्युज नेटवर्क समुह परळी बीड महाराष्ट्र -केशव डी मुंडे (उपसंपादक)  ८८८८ ३८७ ६२२

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!