क्राईमबीड

वडवणी मध्ये 400 किलो गोवंश जातीचे मांस जप्त ! आरोपीस अटक

Shocking incident at Upali, Vaddani, 400 kg of beef seized

-उपळी गावात वडवणी पोलिसांचा छापा, 400 किलो गोवंश जातीचे मांस जप्त करून आरोपीस अटक

केशव डी मुंडे वेगवान मराठी प्रतिनिधी बीड  दिनांक 08/06/2025 रोजी दुपारी वडवणी पोलीस ठाणे हद्दीमध्ये उपळी या गावात एक इसम गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करीत असल्याची गोपनीय माहिती वडवणी प्रभारी वर्षा व्हगाडे यांना मिळाली.

त्यांनी तात्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला असता तेथे फिरोज सिकंदर कुरेशी वय 35 वर्ष, राहणार उपळी हा त्याचे घरामध्ये गोवंश जातीची जनावरे कत्तल करताना मिळून आला.

पोलिसांनी घटनास्थळावरून 80 हजार रुपये किमतीचे 400 किलो वजनाचे गोवंश जनावरांचे मांस, लोखंडी सुरे व लाकडी ओंडका जप्त केला.

सध्या आरोपी अटकेत असून पुढील तपास सहाय्यक फौजदार विष्णू जायभाये करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांचे मार्गदर्शनाखाली वडवणी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे, पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड, संदीप चव्हाण, पोलीस अंमलदार विष्णू खरात, किरण इरमले, वसंत करे यांनी केली

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!