जालना-तिरुपती मार्गे परळी या गाडी संदर्भात नविन अपडेट
New update regarding Jalna-Tirupati train

जालना – तिरुपती विशेष गाड्या पुन्हा सुरु; उदगीर, बीदर,परळी, परभणी मार्गे प्रवास झाला सोपा
वेगवान मराठी प्रतिनिधी परळी केशव डी मुंडे दि. 21 जून 2025 : दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी पूर्वी नांदेड विभागातून चालवल्या जाणाऱ्या जालना – तिरुपती – जालना विशेष गाड्या पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे संघर्ष समिती, उदगीर यांच्यावतीने देण्यात आली आहे.
या विशेष रेल्वे गाडीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
—विशेष गाडी क्र. 07609 – जालना ते तिरुपती
प्रस्थान: जालना येथून दर सोमवारी सकाळी 07.00 वाजता
आगमन: तिरुपती येथे मंगळवारी सकाळी 10.45 वाजता
कालावधी: 07 जुलै 2025 ते 30 मार्च 2026
ही गाडी परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, उदगीर, बीदर, विकाराबाद, लिंगमपली, गुंटूर, गुडूर, रेणीगुंठा या मार्गे धावणार आहे.
—विशेष गाडी क्र. 07610 – तिरुपती ते जालना
प्रस्थान: तिरुपती येथून दर मंगळवारी दुपारी 15.15 वाजता
आगमन: जालना येथे बुधवारी दुपारी 15.50 वाजता
कालावधी: 08 जुलै 2025 ते 31 मार्च 2026
ही गाडी रेणीगुंठा, गुडूर, गुंटूर, चेरलापल्ली, लिंगमपली, विकाराबाद, जाहिराबाद, बीदर, उदगीर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर मार्गे धावेल.
-या विशेष रेल्वे गाडी मध्ये प्रवाशांसाठी 2 AC, 3 AC, स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास डब्यांची सोय करण्यात आली आहे.
यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध होईल.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.







