आरोग्यक्राईमबीड

ऊसतोड महिलांचा गर्भपात कराल तर होणार कठोर कारवाई

Scheduled Caste and Tribe Committee member Gorakh Lokhande reviewed the health of sugarcane harvesting women

अनुसूचित जाती जमाती समितीचे सदस्य गोरख लोखंडे यांनी घेतला ऊसतोड महिलांच्या आरोग्या बाबतचा आढावा

बीड प्रतिनिधी दि.19 जुन -,2025 वेगवान मराठी केशव डी मुंडे ) :- ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्याबाबत असलेल्या विविध समस्यांचा आज अनुसूचित जाती जमाती समितीचे सदस्य गोरख लोखंडे यांनी बीड येथे एका बैठकीत आढावा घेतला.

बीड येथील पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी याबाबत आढावा घेताना ऊसतोड महिला कामगार महिलांची ऊसतोडणीस जाण्यापूर्वी व तोडणी वरून परत आल्यानंतर अशा दोन्ही वेळा आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.

अवैधरित्या महिलांचा गर्भपात केला जातो अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत असे आढळून आल्यास त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी अचानकपणे खाजगी रुग्णालयांची तपासणी करावी तसेच सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये तक्रार करण्यासाठीचा टोल फ्री क्रमांक दर्शनी भागात लावण्यात यावा असेही ते म्हणाले.

ग्रामपंचायत गर्भवती महिलांची माहिती आरोग्य विभागाने आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून गोळा करावी व यापुढील काळात अवैधपणे गर्भपात होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असेही लोखंडे यांनी यावेळी सांगितले.

आज झालेल्या या बैठकीत नवनीत कौवत पोलीस अधीक्षक बीड, सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक बीड, पूजा पवार प्रभारी पोलीस स्टेशन पिंपळनेर, डॉ संतोष शहाणे

अतिरिक्त जिल्हा शिल्लचिकित्सक बीड, तत्त्वशील कांबळे सामाजिक कार्यकर्ते बीड, गोरे साहेब समाज कल्याण बीड नितीन पतंगे समाज कल्याण बीड आदींची उपस्थिती होती

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!