
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी च्या घटणा थांबता थांबेनात , अवैद्यपणे सुरु आसलेले धंदे देखील पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी कितीही जोर लावला तरी
स्थानीक पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांसह ठाणे प्रभारी यांच्या तोंडाला हाफ्ते वसुलीचे रक्त लागलेल्या लांडग्या प्रमाणे परस्थिती झाली आहे
वेगवान मराठी प्रतिनिधी बीड आज दिनांक 10/03/2025 रोजी इसम नामे ज्ञानेश्वर संजय सानप, वय 22 वर्ष, रा.वडझरी ता. पाटोदा जिल्हा बीड हल्ली मुक्काम जुना चऱ्हाटा रोड बीड हा स्वतःकडे एक गावठी पिस्टल कंबरेला लावून फिरत असले बाबत गोपनीय माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडून एक गावठी पिस्टल जप्त करून पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गुरन 133/2025 कलम 3/25 आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.नवनीत कावत, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, मा.पोलीस निरीक्षक उस्मान शेख, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार अशोक दुबाले, दीपक खांडेकर, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप,नारायण कोरडे, विकी सुरवसे यांनी केली आहे.
वेगवान मराठी बीड wegwan marathi beed

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








