बीड

विद्यार्थांच्या आरोग्य व सुरक्षांचे काय ? परळीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

Statement to the Group Education Officer regarding the health and safety of students in schools and classes in Parli taluka

– सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव सरांच्या संकल्पनेतील विद्यार्थ्यांच्या हिताचे उपाय आणि शासकीय नियमांची अंमलबजावणी संदर्भात गटशिक्षणाधिकारी परळी वै यांना अधिकृत निवेदन आज रोजी देण्यात आले …

!! बीड येथील उमा किरण क्लासेस प्रकरणा सारखी घटणा परत घडु नये याची खबरदारी घेऊन कायदेशीर नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी !!

!! तसेच खासगी शाळांसह,कोचिंग क्लासेस ची गिनती करुण त्यांची नोंद घेण्यात यावी व विद्यार्थ्याना योग्य सुविदा व सुरक्षा प्रदान करण्यात यावी !!

!! शाळा आणि क्लासेस सिसिटीव्ही कॅमेऱ्या खाली चालवावेत !! –

 

वेगवान मराठी परळी प्रतिनिधी दि 4 जुलै 2025 –

बीड येथे शिक्षकी पेशाला कलंकित करणाऱ्या घटणेमुळे शैक्षणिक क्षेत्रास मोठा धक्का बसला आसुण या निमिताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भवितव्य आहे. आणि तेच जर असुरक्षीत असतील तर देशाचे भविष्य धोक्यात येणार यात शंकाच नाही.

विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेच्या बाबतीत संभाव्य धोके टाळण्याकरीता सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव व पत्रकार केशव मुंडे यांनी परळी वैजनाथ येथील मा. गटशिक्षणाधिकारी यांना तात्काळ उपाय योजना कराव्यात आणि केलेल्या सुचणांची आमलबजावणी करण्यात यावी. अशा आशयचे लेखी स्वरूपात निवेदन सादर केले आहे.

यामध्ये प्रामुख्याने विषयी परळी तालुक्यातील शिक्षण विभागाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत असणाऱ्या सर्व सरकारी व खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता प्रत्येक शाळेत पिण्याचे शुद्ध पाणी व शौचालय (वॉश रूम) आहे का ?

त्याच बरोबर सुरक्षेचा विचार करता प्राथमिक उपचार पेटी, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन परिस्थितीत ज्वलन प्रतिरोधक साधनं (फायर किट) आहेत का ? तसेच शाळेचे बिल्डिंग फिटनेस कसे आहे ? या बाबींची इत्यंभूत चौकशी करण्यात यावी.

सद्यपरिस्थितीत ट्युशन क्लासेसची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे. मात्र क्लासेस मध्ये वरील सर्व सुविधा उपलब्ध आहेत का ?

त्याच बरोबर परळी शहरात एकूण किती (ट्युशन) क्लासेस चालतात, कुठे कुठे चालतात, त्यासर्व संचालकांची नावं आणि त्यांचा पत्ता याची सर्व आकडेवारी निश्चित करण्यात यावी.

जेणेकरून त्या क्लासेस मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न निर्माण होणार नाहीत.

सदरील निवेदनाची दखल घेत याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री एस. एम. कनाके यांनी निवेदनातील सूचना व मागण्यांची त्वरीत पूर्तता करण्याच्या दृष्टीने वरिष्ठांशी बोलुण कार्यवाही केली जाईल असा शब्द दिला आहे.

एकंदरीत शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या आईचा घो पाहता , एकुण एक लोकप्रतिनीधी आणि शासकीय सेवेतील सरसकट कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी जि.प.शाळा,व कुटुंबासाठी शासकीय रुग्णालय बंधनकारक करण्यात आल्या शिवाय या दोन्ही क्षेत्रात प्रगती होणार नाही ! 

भविष्यात या विषयी मोठा लढा उभा करण्याची गरज पडली तर तो ताकदीने उभा केला जाईल व सर्व स्तरावर या साठी जनजागृती करुण यामध्ये सर्व नागरीकांना सामाऊण घेण्यात येणार आसल्याची माहिती श्री जाधव सर यांनी दिली 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!