देश -जगबीड

कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेतील भारतीय संघाचा कर्णधार परळीत सन्माणीत

Indian team captain in Comrade Marathon honoured in Parli

जागतिक दर्जाच्या”कॉम्रेड मॅरेथॉन” मध्ये भारताचे नेतृत्व करणारे बीडचे डॉ. संजय जानवळे यांचा परळीत सत्कार

शरीर संपत्ती हि सर्वोत्कृष्ट संपत्ती असून आपण ती जपली पाहिजे – डॉ. संजय जानवळे

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे दि 7 जुलै  परळी वैजनाथ :दक्षिण आफ्रिकेत संपन्न झालेल्या कॉम्रेड मॅरेथॉन रेसमध्ये भारताचे नेतृत्व करणारे जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध धावपट्टू डॉ. संजय जानवळे यांचा परळीत नितीन शिंदे मित्र मंडळाच्या वतीने आषाढी एकादशीच्या सुमुहूर्तावर सहृदय सत्कार करण्यात आला.

बीड येथील विघहर्ता हॉस्पिटल चे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. संजय जानवळे (MBBS, MD) यांनी बीड सह महाराष्ट्र राज्याचे नाव सातासमुद्रापार झळकवत ९० किलोमीटर अंतराच्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत भारत देशाचे उत्कृष्टपणे प्रतिनिधित्व करत अद्वितीय यश संपादन केले आहे.

नितीन शिंदे मित्र मंडळ परळी वैजनाथ यांच्या वतीने डॉ. संजय जानवळे यांच्या सर्वोत्तम कामगिरीचे कौतुक करत आषाढी एकादशीच्या सुमुहूर्तावर नेहरू चौक, तळ येथे सहृदय सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. संजय जानवळे म्हणाले की प्रत्येक व्यक्तीने व्यायामाला महत्व दिले पाहिजे, शरीर संपत्ती हि सर्वोत्कृष्ट संपत्ती असून निरोगी राहण्यासाठी व्यायामाचे अनण्यसाधारण महत्व असून आपण नित्य नेमाने व्यायाम करणे आवश्यक आहे.

सत्कार समारंभ प्रसंगी नितीन शिंदे यांनी प्रास्ताविक तर सेवक राम जाधव यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी डॉ यशवंत देशमुख, राजाभाऊ फड, बाबासाहेब शिंदे पाटील, शिवाजीराव देशमुख, ॲड भूषण राजे देशमुख, ॲड अर्जुन सोळंके, रणजित देशमुख, सुनील चिखले, नीरज देशमुख,

साईनाथ विभुते, ऋषिकेश दुबे, प्रमोद जाधव, गणेश सावंत, तातेराव काटेकर, बापू बावणे, शेख फेरोज भाई यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!