बीड

बजरंग सोनवणे,संदिप क्षीरसागरांचे खड्यांना दिले नांवे !! धानोरा रोडवरील खड्यांचा नामकरण सन्मान सोहळा”

वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने अगळे वेगळे आंदोलन

!!! धानोरा रोडवरील रस्त्याची दयनीय अवस्था : भर पावसात वंचितचे “होडी चलाव” आंदोलन !!!

!! तर खड्ड्यांना दिला खासदार, आमदारांच्या नावाचा ‘सन्मान’ !!

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे  बीड प्रतिनिधी दिनांक 26 जुलै 2025 – बीड शहरातील धानोरा रोड परिसरातील 30 मीटरचा मुख्य रस्ता गेल्या पंधरा वर्षांपासून अत्यंत खराब स्थितीत असून, अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. धुळीकाणामुळे व्यापारी वर्ग त्रस्त असून, विद्यार्थ्यांच्या ये–जा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

सदर रस्त्यासाठी वर्ष 2019-20 मध्ये डांबरीकरणाचे काम मंजूर झाले होते आणि कंत्राटदारास कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते. मात्र, एका व्यक्तीने भूसंपादन मावेजाच्या मागणीसंदर्भात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाद मागितल्यामुळे हे काम रखडले.

जिल्हाधिकारी बीड यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, 2014 पूर्वी हा रस्ता जिल्हा परिषद बीडच्या अखत्यारीत होता, म्हणून भूसंपादनासाठी जिल्हा परिषद जबाबदार आहे. संबंधित प्रस्तावही बांधकाम विभाग क्र. 1, जि.प. बीड मार्फत सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

मात्र, प्रकरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित असल्यामुळे काम पूर्णतः थांबवण्यात आले आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी बीडच्यावतीने जिल्हाधिकारी, बीड नगरपरिषद व संबंधित लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

प्रमुख मागण्या पुढे अशा मांडण्यात आल्या आहेत –
रस्त्याचे काम थांबवण्यामागील नेमके कारण व न्यायालयीन प्रकरणाची माहिती जाहीर करावी.
भूसंपादनाचा वाद तातडीने निकाली काढावा.
उच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न व्हावेत.
डांबरीकरणाचे काम त्वरित सुरू करावे.

सदर मागण्यांकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सतत दुर्लक्ष झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी बीडच्या वतीने “होडी चलाव आंदोलन” व “खड्ड्यांचे नामकरण सन्मान सोहळा” धानोरा रोड परिसरात आयोजित करण्यात आला. या आंदोलनात व्यापारी, विद्यार्थी, महिला आणि नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला.

नागरिकांच्या जिवाशी व सुरक्षिततेशी खेळणाऱ्या प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करत आंदोलनात  रस्त्यावरील अनेक खड्ड्यांना लोकप्रतिनिधी व आधिकाऱ्यांचे नावं देत प्रशासनाच्या निद्रिस्त कारभारावर बोट ठेवलं.

आता हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम वीर, सहसंघटक अर्जुन जंजाळ, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राजेश कुमार जोगदंड, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष रोहन मगर, महिला जिल्हा उपाध्यक्ष पुष्पाताई तुरुकमाने, ता.किरण वाघमारे, शहराध्यक्ष लखन जोगदंड, संदीप जाधव, आकाश साबळे, शेख पाशाभाई, प्रकाश उजगरे, प्रदीप खळगे, राजाभाऊ घोषीर, सतीश क्षीरसागर, अभिजित बनसोडे, आप्पा पवार, मिलिंद सरपते यांच्यासह व्यापारी, शाळकरी विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला आहे.

खड्ड्याला दिले खासदार आमदाराचे नाव

बातमीची मुख्य चौकट 

– धानोरा रोडचे डांबरीकरणाचे काम तात्काळ पोलीस बंदोबस्तामध्ये करण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने होडी चलाव आंदोलन करण्यात आले तसेच रस्त्यावरील खड्ड्यामध्ये तलावाचे स्वरूप आल्याने

एका खड्ड्याला 1) खासदार बजरंग बप्पा सोनवणे खड्डा  (2)आमदार संदीप क्षीरसागर खड्डा  आणि  (3) तिसऱ्या खड्यास मुख्याधिकारी -निता अंधारे खड्डा आसे नामकरण करुण प्रतिकात्मक निषेध करण्यात आला आसुण उपहासात्मक पद्धतीने वंचित बहुजन आघाडी च्या वतिने रसत्याच्या दुर्दशे कडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासणाचे लक्ष्य वेधण्यासाठी आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले

लवकरच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री अजित दादा पवार व जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांचेही नाव खड्ड्याला देण्यासाठी धानोरा रोडला व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांनी सांगितले.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!