संडे टु मंडे सुपर संडे !! विलास बडे बोलणार हैपी बर्थडे पंकजा मुंडे
Vilas Bade's lecture on the occasion of Pankaja Munde's birthday on Super Sunday in Parli

!! मंत्री.पंकजा मूंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार आज रोजी पत्रकार विलास बडे सरांचे व्याख्यान !!
!! युवक, युवती व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे- प्रा.पवन मुंडे !!

वेगवान मराठी परळी वैजनाथ प्रतिनिधी केशव डी मुंडे- दिनांक 27 जुलै 2025 रविवर..राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि. 27 जुलै रोजी परळीत प्रसिद्ध वक्ते, आयबीएन लोकमतचे सहाय्यक संपादक विलास बडे यांच्या व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरूणांना मार्गदर्शक ठरणाऱ्या व्याखानाला युवक, युवती आणि नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक,माजी नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांनी केले आहे.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे सकाळी 11 वाजता पत्रकार विलास बडे यांच्या व्याख्यान होणार आहे. ना. पंकजाताई मुंडे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते.
त्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांनी युवकांना प्रेरणा मिळावी, चांगले विचार ऐकायला मिळावेत या उद्देशाने हा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेण्याची संधीसुद्धा विलास बडे यांना मिळालेली आहे. भल्या भल्या पुढाऱ्यांना घाम फोडणारे आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देणारे असे नामांकित पत्रकार व व्याख्याते ते आहेत.
अशा या प्रेरणादायी वस्त्याला ऐकण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन मुख्य संयोजक तथा माजी नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी केले आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








