राजस्थानी मल्टी स्टेट ठेवीदार कृती समितीच्या लढ्याला यश
राजस्थानी मल्टी स्टेट ठेवीदार कृती समितीच्या लढ्याला यश

राजस्थानी मल्टी स्टेट ठेवीदार कृती समितीच्या लढ्याला यश !! लिक्विडेटर परळीत दाखल !!
!! मिळुण मिसळुण काम करण्या बाबत ठेविदारांच्या शिष्टमंडळास लिक्विडेटर मोटे आवाहन !!
!! तुम्ही हाक द्या आम्ही साथ देऊ ठेवीदार कृती समिती चे अध्यक्ष -सेवकराम जाधव !!

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे दिनांक 3 आगस्ट 2025 परळी :– बऱ्याच महिन्यांपासून राजस्थानी मल्टीस्टेटवर लिक्विडेटर नेमणूकीची प्रतीक्षा होती. ती आज पूर्ण झाली शिरूर कासारचे ए आर श्री मोटे साहेब यांनी आज राजस्थानी च्या हेड ऑफिस ला भेट देत चार्ज घेतला. याप्रसंगी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ठेवीदार कृती समिती च्या पदाधिकारी व ठेवीदारांनी श्री मोटे साहेबांसह त्यांच्या सहकारी टिमचे परळी शहरात अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा देत ठेवीदार कृती समिती खांद्याला खांदा देऊन सोबत राहील याची ग्वाही दिली
आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडुण परळी वैजनाथ येथील हालगे गल्ली येथील राजस्थानी मल्टिस्टेट च्या मुख्य शाखेचा ताबा घेतला नेमणूक झाल्या नंतर परळी शहरात प्रथमच आलेल्या लिक्विडेटर व त्यांच्या टिमचे शाल श्रिफळ व पुष्पगुच्छ देऊण स्वागत करुण सत्कार करण्यात आला…
मागील दोन वर्षापासुण सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव यांच्या सक्ष्म नेतृत्वात कृती समिती करत आसलेल्या लढ्यास यश आले आहे,दरम्यान मागील महिण्यात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन लवकरात लवकर लिक्विडेटर ची नियुक्ती करण्यात यावी आशी आग्रही मागणी केली होती..
.उदगीर येथील ठेवीदार व भाजपचे नेते जहागीरदार साहेब व तेथील स्थानीक ठेवीदारांसोबत परळी वैजनाथ येथून जाउण श्री.सेवकराम जाधव आणि केशव मुंडे यांनी घेतलेल्या भेटीत मानणीय मंत्री महोदयांनी जाधव सर यांंना काळजी करु नका लवकरच तुमचे काम मार्गी लावतो आसे जवळ बोलाउण घेत सांगीतले होते…
दरम्यान लिक्विडेटर मोटे साहेबांनी येणाऱ्या अडचणी व समस्या आपण सर्वजन मिळुण पार करत आसे सांगतीले तर ठेवीदारांच्या वतीन ठेवीदारांचे नेते सेवकराम जाधव सर यांनी अडचन आली तर आर्ध्या रात्री फोन करा आम्ही तुमच्या सोबत उभे राहु आसे सांगीतले..
यावेळी ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव सर यांच्यासह वेगवान मराठी चे सहसंपादक पत्रकार केशव मुंडे व ठेविदार कृती समितीचे पदाधिकारी बाबासाहेब पांचांगे गुनाबाई मुंडे मिलिंद क्षिरसागर व इतर सदस्य व ठेवीदार या प्रसंगी उपस्थित होते

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








