
!! अखेर नीता अंधारे यांची बदली !! बीड शहर बचाव मंचाच्या प्रयत्नांना यश !!
!! अखेर अंधार हटला परंतु या अंधारात काय काय घडले याची सखोल कसून तपासणी व्हावी ही बीड शहर बचाव मंचाची मागणी आहे !!
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि.मुंडे दिनांक 2 आगस्ट 2025 बीड प्रतिनिधी – बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांची बदली करण्यात आली आहे. यांची बदली करण्यात यावी अशी मागणी बीड शहर बचाव मंचाच्या वतीने सातत्याने लावून धरण्यात येत होती. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार भेटून बीड शहर बचाव मंचाच्या वतीने निवेदने देण्यात आले आहेत.
नगरपालिकेचा गलथान कारभार व त्यामुळे नागरिकांनाचे होत असलेले हाल याबद्दल प्रशासनाला सातत्याने अवगत करून देण्यात आलेले आहे.
मुख्याधिकारी नीता अंधारे यांची जरी बदली झाली असली तरी त्यांच्या कार्य काळामध्ये झालेल्या सर्व कामकाजांची सखोल कसून तपासणी करण्यात यावी तसेच त्यांच्या कार्य काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून केला जाणारा विकास पूर्णपणे का ठप्प झाला होता याची कारणे जनतेपुढे आली पाहिजेत.
नीताताई अंधारे यांच्या डोक्यावर कोणा कोणाचा हात होता व त्यांची कोणत्या राजकीय पुढार्यांची सांठ-गाठ होती हेही उजेडात येण्याची गरज आहे.
अंधारे यांच्या काळामध्ये आलेले निधी व नगरपालिके कडे जमा होणारा वसुलीचा पैसा हा कोणाच्या सांगण्यावरून कशा पद्धतीने वापरण्यात येत होता हेही जनतेपुढे येणे तितकेच गरजेचे आहे.
येणारे नवीन मुख्याधिकारी लवकरच नगरपालिकेचा कार्यभार हाती घेतील व त्यांच्याकडून चांगला कारभार होईल अशी अपेक्षा आपण सर्वजण सर्व स्तरातून मिळून बीडची जनता म्हणून नवीन येणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांकडून करत आहोत.
बीड शहराच्या व बीड नगरपालिकेच्या दुर्दशेविषयी तसेच शहरातील दयनीय परिस्थिती विषयी येणाऱ्या नवीन मुख्याधिकाऱ्यांना बीड शहर बचाव मंच अवगत करून दिल्याशिवाय राहणार नाही.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








