क्राईमबीड

परळीत परप्रांतीय 20 वर्षिय तरुणीवर 3 नराधामांनी केला आळीपाळीने बलात्कार

20-year-old migrant girl raped by three men in Parli

!! आस्वलांबा गावातील निर्मानुष स्थळी नेहुण तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना !!

!! परळी रेल्वे स्टेशन वरुण तरुणीला फुस लाऊण पुजा गुट्टे सतिश मुंडे व मोहशीन पठाण यांनी उचलले !!

सध्यास्थिती पाहता लौज हौटेल ऐवजी आस्वलांबा येथील भागवत कांदे कडे शिकार घेउण गेले !! 

केशव डि मुंडे वेगवान मराठी प्रतिनिधी परळी वैजनाथ दिनांक 11 / 8/ 2025 मागील दोन वर्षा पासून परळीसह बीड जिल्ह्यात तृतियपंथीची रोडवर प्रचंड दहशत निर्माण झाली आहे गतिरोधकाच्या ठिकाणी चार पाच जन घोळक्याने आडवे येत वाहने आडवतात आणि जोर जबरदस्ती करतात.अश्लिल चाळे करुण प्रवाशांना पैसे देण्यास मजबुत केले जाते…

दरम्यान त्यांच्या या रोजच्या प्रकारास वैतागुन काहीजनांचे सुटका करुन घेण्याच्या नादात अपघात होत आहेत..आणि हे तृतियपंथी मोक्कार नशेडी आसतात यातुनच ते पैशांच्या मोबदल्यात आशा लहान मोठ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होऊण गुन्हेगारांना सहकार्य करत आसुण यांचे मोठे नेटवर्क आसण्याची शक्यता आहे तशी लोकांमध्ये चर्चा आसुण यांचा कोणी तरी मोठा आक्का आसल्याचे बोलले जात आहे

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार घडलेल्या घटणेचा घटणाक्रम हा पुढील प्रमाणे आहे, 20 वर्षांची एक इतर राज्यातील परप्रांतीय एकटीच तरुणी रेल्वेने मुंबईवरुन हैदराबादकडे जाणार होती.

परळी येथील रेल्वे स्टेशनवर उतरुन ती समोरीलच एका हॉटेलमध्ये जेवत असताना तृतीयपंथी पूजा गुट्टे हिची तिच्यावर नजर पडली आणि इथुनच घटणाक्रमास प्रारंभ झाला या आगोदर देखील नविन प्रवाशांवर पाळत ठेऊण त्यांना बेशुध्द करणे,हाणमार करणे आणि शेवटी त्यांना लुबाडुण धमकी देवुन सोडुण देणे हे प्रकार सर्रास घडलेले आहेत…

चर्चा तर आशी पण आहे कि या गुन्हेगारां सोबत पोलीसांचे साठेलोठे आसुण पोलीसांच्याच आशिर्वादाने हा खेळ सुरू आसतो त्यामुळे परळी शहरात देखील अवैध धंदे आज हि तेवढ्याच ताकदिने राजरोस सुरू आहेत आसो….तर पुढे पूजा गुटे या तृतियपंथीने त्या बाहेरील तरुणीशी जवळिक करुण संवाद साधत तिची गरज जाणून घेतली आणि काम देण्याचे आश्वासन दिले. यानंतर पूजा हिने तिचे ओळखीचे मित्र सतिश मुंडे  व मोहसीन पठाण यांना बोलावून घेतले.

यानंतर ते तिघे पीडित मुलीला दुचाकीवर बसवून  अस्वलंबा येथील त्यांचा सवंगडी भागवत कांदे याच्याकडे गेले आणि त्या असहाय एकट्या तरुणीवर आस्वलांबा गावातील शेतात या तिघांनी त्या परप्रांतीय तरुणीवर आळीपाळीने बलात्कार करत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे

सदरील प्रकरणात डायल 112 वर एका युवकाने फोन वरुण पोलीसांना घटनेची माहिती दिली आसता पोलिसांनी या प्रकरणांत तात्काळ सतीश मुंडे, मोहसीन पठाण व भागवत कांदे यांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान पूजा गुट्टे या तृतीयपंथीचा परळी ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणात आता पुढे काय कारवाई होणार, या कडे परळी तालुक्याचीच नाही तर सर्वांचीच नजर 👁️ आहे…

या घटणेतील विशेष बाब हि आहे कि घटणा परळी तालुक्यात घडली आसुण गुन्हा मात्र अंबाजोगाई पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे…

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!