
!! तलवारीने केक कापणाऱ्या इसमास तलवाडा पोलीसांनी केली अटक !!
केशव डि मुंडे वेगवान मराठी प्रतिनिधी दि.11/08/2025 रोजी पोलीस ठाणे तलवाडा येथील अधिकारी अंमलदार यांना प्रसार माध्यामाचे व्हाटसअॅपवर आरोपी नामे बिलाल मुन्शि शेख रा.राजापुर ता.गेवराई जि.बीड याने त्याचे नातेवाईकाचे लहान मुलाच्या वाढदिवसा निमित्त हातात एक लोखंडी तलवार घेवून फोटो व्हायरल झाल्याची खात्री लायक माहिती मिळाली
त्यावरुन पोलीस ठाणे तलवाडा येथील अधिकारी/अंमलदार यांनी बिलाल मुन्शि शेख रा.राजापूर ता. गेवराई जि.बीड याचे राहते घरी जावुन झडती घेतली आसता
त्याच्या घरात एक धारदार तलवार मिळून आल्याने ते जप्त करुन नामे बिलाल मुन्शि शेख वय 22 वर्ष रा.राजापुर ता. गेवराई जि.बीड यांचे विरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कौवत, मा. सहायक पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निरज राजगुरु,
पोलीस ठाणे तलवाडा प्रभारी अधिकारी सपोनि श्री. मनोज निलंगेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे तलवाडा येथील पोउपनि स्वप्निल कोळी, पोह/नारायण काकडे, पोह मोहसीन शेख, पोअं/अमोल अवसरमल यांनी केली.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








