क्राईमबीड

“कमाल झाली”दुसऱ्याच दिवशी चोर पकडला तो पण परळी पोलीसांनी

The incident took place on the 13th, the complaint was filed on the 14th, and the accused was arrested on the 16th, along with the case file.

!! दि. 13 / 8 / रोजी घटणा दि 14 /8/ रोजी फिर्याद  आणि दि 16/08/2025: चोरीतील आरोपी व मुद्देमाल पोलीसांच्या ताब्यात !!

!! या घटणेचे वैशिष्टय़ म्हणजे विश्वास वाटणार नाही पण खरच सदरील कामगिरी परळी पोलीसांनी केली आहे !!

केशव डि मुंडे वेगवान मराठी दि. 14/08/2025 रोजी फिर्यादी नामे नाथराव माणिकराव फड वय 67 वर्षे व्यवसाय सेवा निवृत कर्मचारी रा.शंकर पार्वती नगर परळी वै. ता. परळी वै, जि. बीड यांनी पोलीस स्टेशन संभाजीनगर परळी वै, येथे फिर्याद दिली की, दि. 13/08/2025 रोजी 10.55 वा. चे दरम्यान परळी बस स्थानक येथुन अंबाजोगाई येथे जाण्यासाठी बस मध्ये चढत असताना

त्यांचे गळ्यातील सोन्याचा गोप वजन 25 रॉम सध्या किं. अंदाजे 2,50,000/ रुपयेची सोन्याचा गोप कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरले

या बाबत. पो.स्टे. संभाजीनगर येथे दि. 14/08/2025 रोजी गु.र.नं. 164/2025 कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पो. नि. ढोणे यांचे आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास सफाँ, 613 दिनकर यांचेकडे देण्यात आला.

गुन्ह्याचे संदर्भात व फिर्यादी हा जेष्ठ नागरीक असलायने मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे व मा. अ.पो.अ. श्रीमती तिडके मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीयपोलीस अधिकारी श्री. शिंदे यांचे सुचने प्रमाणे परळी शहरात नविन अ‌द्यावत बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेच्या फुटेजच्या आधारे तसेच सायबर सेल यांची तांत्रीक मदत घेतली

सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेतला असता सदरचा गुन्हा आरोपी नामे प्रकाश श्रीराम जाधव वय 34 वर्षे रा. हिवरसिंगा ता. शिरूर जि. बीड याने केला असल्याचे निषपन्न झाल्याने पो.स्टे. संभाजीनगर डी. बी. पथक यांनी खोकर मोहा ता. शिरूर जि.बीड

येथुन आरोपीला ताब्यात घेवून नमुद आरोपीकडे सखोल तपास करून त्याचेकडून सोन्याचा गोप वजन 25 ग्रॅम किं. अंदाजे 2,50,000/ रुपये किंमतीचा मु‌द्देमाल हस्तगत केला आहे. गुन्ह्याची पुढील कार्यावाही चालु आहे.

सदरची कामगीरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी. एस. ढोणे, ग्रेपोउपनि मिसाळ, सफौ/613 सौंदनकर, व डी.बी. पथकातील सफौ /1253 नागरगोजे, पोह/416 साजीद पठाण, पोअ./710 चव्हाण, पोअं. 1721 डॉगळे, पोअं. 1109 घुगे सर्व पो.स्टे. संभाजीनगर यांनी प्रभावीपणे कामगीरी बजावली आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!