बीड

परळीतील सोमेश्वर देवस्थानी मुस्लिम धर्मीय व्यक्तीने हे काय केले ?

Amazing social act of a Muslim devotee at Jirewadi Someshwar Charan in Parli

!! परळीतील जिरेवाडी येथील तिर्थक्षेत्र सोमेश्वर चरणी मुस्लिम धर्मीय सोमेश्वर भक्ता कडुण नगरभोजनाचा महाप्रसाद !!

!! जिरेवाडी पंचक्रोशी सह परळी तालुक्यात होतेय सकारात्मक चर्चा !! काय आहे सगळा घटनाक्रम ते पहा 👇 !!

केशव डि मुंडे- वेगवान मराठी दिनांक 26 /8/2025 –जिरेवाडी ता परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे काल दिनांक 25 आगस्ट 2025 सोमवार रोजी श्री सोमेश्वर चरणी अद्भुत सामाजिक सलोखा पहावयास मिळाला श्री सोमेश्वर देवस्थान तिर्थक्षेत्र   जिरेवाडी येथे वर्षभर सोमवार, गुरुवार, शनिवार या दिवशी नगर भोजन हा कार्यक्रम होत असतो परंतु हि बाब.गावासाठी किंवा पंचक्रोशीत नविन नाही कारण नगर भोजन हे शक्यतो स्थानिक गावासह परिसरातील लोकांचे होत असतात म्हणजे फक्त हिंदू धर्मियांचे ..

परंतु आज चक्क एका मुस्लिम धर्मीय व्यक्तीने सोमेश्वर चरणी नगर भोजन दिले.याविषयी परळी परिसरात एका चांगल्या विषयाची बऱ्याच काळानंतर सामाजीक विषयावर सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे .

नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणुन ख्यातीप्राप्त सोमेश्वर देवस्थान जिरेवाडी ता.परळी वैजनाथ जि बीड इथे शेख चांद शेख बशीर या मुस्लिम भक्ताने बोलेल्या नवसाची पुर्तता झाल्याबद्दल नगरभोजनाचे आयोजन केले होते..

सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव येथील मुस्लिम समाजातील वरील उल्लेख केलेल्या तरुण भक्ताने जागृत देवस्थान जिरेवाडी येथील सोमेश्वर देवस्थान येथे मनातील इच्छा पूर्ण झाल्याबद्दल नगर भोजनाचा कार्यक्रम केला..

सोमेश्वर भगवाना विषयी त्यांच्या मनात खूप श्रद्धा आहे. आणि अन्न दान करून नाव गुप्त ठेवण्याचे म्हणजे खूप मोठा सामाजिक व धार्मिक सलोखा आहे ते याच परिसरातील असून त्यांचे मित्र ज्यांनी त्यांना या कामी सहकार्य केले ते खालीलप्रमाणे आहेत

मंचक मारुती फड,रामकिशन फड,नारायण फुलारी,हरिभाऊ फड,गोविंद बबनदादा फड, सर्व कान्हेरवाडी,सोमेश्वर खांडे,राजेश अप्पराव मुंडे,वसंत चव्हाण,दीपक सूरव से,अभिमान मुंडे,नरेश फड,वैजनाथ कांदे,

तसेच श्री सोमेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष..प्रभाकर मुंडे,सचिव श्री प्रा. Adv. पी. पी. कांदे,भानुदास मुंडे, पाटलोबा मुंडे, श्रीहरी (bandappa) कांदे सर्व मान्यवरांनी मिळून त्या सज्जन मुस्लिम व्यक्तीचा मंदिर कमिटी तर्फे सत्कार केला..

विशेष म्हणजे सोमवारी नगर भोजन करण्यासाठी 11 वर्ष नंबर.लागत नाही ..तरी फक्त मुस्लिम धर्मीय व्यक्ती साठी नियम डावलून कमिटीने त्यांना सोमवार देऊन एक सामाजिक सलोखा कायम केला कारण देव धर्म या गोष्टीला धर्माचे बंधन नसते ..

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!