देश -जगमहाराष्ट्र

जगातील एकमेव मंदिर जिथे आहे गणपतीच्या मानवी चेहऱ्याची मुर्ती

The only Ganesha temple in the world with a human-faced idol

!! गणेशाचे जगातील एकमेव आसे मंदिर जिथे भगवान गणपती ची मुर्ति हि मानवी चेहऱ्याची आहे !

!केशव डि मुंडे- वेगवान मराठी गणपती विशेष : दिनांक 27 आगस्ट 2025 – मानवी शीर असलेले आर्थातच मानवी चेहरा असलेले जगातील एकमेव गणपती मंदिर हे दक्षिन भारतातील तमिळनाडू या राज्यात आहे, या मंदिरात गणपतीला त्याच्या मानवी मस्तक असलेल्या मूळ रूपात पूजले जाते. हे मंदिर आदि विनायक मंदिर म्हणून ओळखले जाते आणि यातील मूर्तीला आदि गणपती असे म्हणतात. ही मूर्ती गणपतीच्या गजमुख स्वरूपा पूर्वीच्या रूपात आहे, म्हणजेच महादेवा कडुण गणपतीला हत्तीचे मुख लावण्यापूर्वीचे हे रूप आहे.

भारतीय संस्कृती हि पुर्वी पासुण किती प्रगत होती याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे देवाधीदेव महादेवाकडुन करण्यात आलेली जगातील पहिली सर्जरी होय . माता पार्वतीने स्नान करत आसताना संरक्षणाची जबाबदारी गणपती वर सोपवली आसतान अचानक त्या ठिकाणी महादेव येतात आणि बाल गणपती आणि महादेवा मध्ये भयंकर युद्ध होते

यातच महादेवा कडुण गणपतीचे शिरछेद करण्यात येते स्वभावीकच त्यानंतर पार्वती आणि महादेवा मध्ये कडाक्याचे भांडण होते अखेर पत्नी हाट्टापुढे आणि घडलेल्या अपराधाचा पश्चाताप होऊण महादेवा कडुण  गणपतीला पुन्हा जिवंत करण्याचे औपरेशन हाती घेतात व ऋषीमुनींच्या साह्याने गणपतीच्या मुखाची सर्जरी गणपतीच्या शरीरावर करुण गणपतीला पुनर्जिवित करतात आशा प्रकारची थोडक्यात आख्यायिका आहे

@ मंदिराचे वैशिष्ट्य
मानवी चेहरा:@
या मंदिरात गणपतीची मूर्ती मानवी चेहऱ्यासह आहे, जी त्याच्या गजमुखाच्या नेहमीच्या रूपापेक्षा वेगळी आहे.

(आदी विनायक)
गणपतीला गजाचे मुख लावण्यापूर्वीचे रूप असल्याने याला आदि विनायक (प्रारंभिक विनायक) असेही म्हटले जाते.

© ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व
शिवाने हत्तीचे मुख दिले:®

पौराणिक कथानुसार, शिवाने आपल्या शोकाकुल पत्नीला सांत्वन देण्यासाठी गणपतीला हत्तीचे मुख दिले होते. या मंदिरातील मूर्ती या घटनेपूर्वीच्या गणपतीच्या रूपात आहे.

( ऐतिहासीक महत्व )
या मंदिराची स्थापना सातव्या शतकात झाली असावी, असे मानले जाते आणि यातील मूर्ती मानवी मस्तक असलेल्या गणपतीची जगातील एकमेव मूर्ती असल्याचे म्हटले जाते.

(मंदिरा चे स्थळ) 
हे आदिविनायक मंदिर तमिळनाडूमध्ये स्थित कुरनुर येथे आहे …WEGWAN MARATHI

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!