
!! आंबाजोगाई येथे रात्री अविनाश देवकर ची हत्या करुण पळुन गेलेल्या स्वराज पौळ च्या मुसक्या आवळल्या !!
केशव डि मुंडे वेगवान मराठी 27 आगस्ट 2025 आसा घटला घटणाक्रम – 26 आगस्ट मंगळवारी रोजी रात्री ८.३० वाजता अविनाश देवकर, त्याचा मित्र सलमान शेख व स्वराज पौळ हे तिघेही न्यु दरबार हॉटेल मध्ये बसून दारू पित होते. दरम्यान, अविनाश व स्वराज यांच्यात पैशाच्या देणंघेणावरून वाद झाला. अविनाश बाजूच्या केबिनमध्ये गेला असता स्वराज त्याच्या मागोमाग गेला.
काही क्षणातच केबिनमध्ये जोरात आरडाओरडा झाला. आवाज ऐकून सलमान बाहेर धावत आला असता स्वराज हा अविनाशच्या डोक्यावर कोयत्यासारख्या धारदार हत्याराने वार करत असल्याचे त्यास दिसून आले. सलमानने मध्ये पडून अविनाशला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याही हात गंभीर दुखापत झाली.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अविनाशचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर स्वराज घटनास्थळाहून पसार झाला. याप्रकरणी अविनाशची आई अंजना शंकर देवकर यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी स्वराज पौळ याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अविनाशचा खून केल्यानंतर स्वराज पौळ याने घटनास्थळाहून पळ काढला होता. घटनेचे गांभीर्य आणि अविनाशच्या नातेवाईकांचा वाढत जाणारा संताप लक्षात घेत अंबाजोगाई शहर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली. विविध सीसीटीव्ही फुटेज, सीडीआरच्या साह्याने पोलिसांनी तपासाला गती दिली.
स्वराज लातूरहून पुण्याकडे जाण्यासाठी खासगी लक्झरी बसमध्ये बसला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना त्याची ओळख पटली.
अंबाजोगाई पोलिसांनी तत्काळ सोलापूर पोलिसांसोबत संपर्क साधून सापळा रचला आणि रात्री दिड वाजताच्या सुमारास स्वप्निलला तुळजापूर – सोलापूर मार्गा बस थांबवत ताब्यात घेतले.
त्याला अंबाजोगाईला आणण्यात आले असन दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








