मराठा आंदोलना बाबत दिपक केदार यांचा मोठा गौप्यस्फोट
Government's tough stance on Maratha agitation likely to lead to setback in Mumbai - Deepak Kedar

बीडमध्ये पॅंथर सेनेचे दीपक केदार यांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा;
दिपक केदार यांच्या कडुण मुंबईत आंदोलनास दगाफटका होण्याची शंका व्यक्त
केशव डि मुंडे वेगवान मराठी बीड दिनांक 29 आगस्ट 2025 बीड, दि. २८ ऑगस्ट २०२५ (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले असून, या आंदोलनाला ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
मात्र, सरकारची आंदोलकांना ‘शत्रू’ मानण्याची मानसिकता असल्याने मुंबईत दगाफटका होण्याची शक्यता असल्याची चिंता केदार यांनी बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी त्यांनी लक्ष्मण हाके यांच्यावरही निशाणा साधला.
बीडमधील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केदार म्हणाले,
मागील १० वर्षांत सरकारच्या दृष्टीक्षेपात आंदोलक म्हणजे शत्रू किंवा नक्षलवादी अशी प्रतिमा निर्माण झाली आहे.
सामाजिक आंदोलन असले तरी सरकार न्याय देण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा किंवा चिघळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.”
मराठा आंदोलनाची दोन महिन्यांपासून तयारी सुरू असतानाही सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
“मुंबईतील आझाद मैदानावर दरमहा विविध आंदोलने होतात, पण मराठा समाजालाच एक दिवसाची परवानगी का? हा सरकारचा आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न आहे,”
असा प्रश्न उपस्थित करत केदार यांनी मराठा समाज शांत राहून आंदोलन करीत असल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
केदार यांनी मराठा आंदोलकांना जागरूक राहण्याचे आवाहन करताना मुंबईत दगाफटका होण्याची शंका व्यक्त केली. “सरकारने आंदोलन दडपण्यासाठी एक समिती नेमली असल्याचा गौप्यस्फोट दिपक केदार यांनी केला आहे.
एकीकडे महात्मा फुले महामंडळ शेवटच्या घटका मोजत असताना कोणतेही आंदोलन न करता परशुराम महामंडळ सुरू करून कर्ज मागणाऱ्यांना १०-१० लाख रुपये दिले जात आहेत.
यावर लक्ष्मण हाके कधी बोलणार? सरकारचे बाहुले बनू नका,” असे म्हणत हाके यांच्यावर टीका केली.
तसेच, मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न न करता सरकारने त्यांचे स्वागत करावे, असे आवाहन केदार यांनी केले.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, महाराष्ट्र प्रवक्ते तसेच बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, अशोक घडवे, वशीम शेख, राजेश वडमारे, आनंद डोंगरे, सुंदर वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केदार यांच्या या विधानांनी राजकीय वातावरणात आणखी ताप वाढवला आहे.
✒️ केशव डि मुंडे वेगवान मराठी उप-संपादक महाराष्ट्र -8888 387 622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.







