बीड

ठेवीदारांच्या ठेवी परत करण्या संबधी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

वेगवान मराठी बीड अपडेट

ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचा आढावा

केशव डी मुंडे वेगवान मराठी दि 29 आगस्ट 2025  महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 (एमपीआयडी ॲक्ट 1999) अन्वये ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याच्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आला.

या बैठकीस पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी कविता जाधव, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस.एस. शेजाळ, गुन्हे अन्वेषण विभाग (CID) छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहजिल्हा निबंधक एस.एम. शेख, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर विभागचे फडणवीस सर, सक्षम प्राधिकारी गौरव इंगोले, जिल्हा उपनिबंधक सतीश तोतावार, जिल्हा सरकारी वकील धनंजय वाकनकर, तसेच विविध वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी एमपीआयडी प्रकरणातील कामकाज गतीने करण्यासाठी जिल्हा मुख्य न्यायाधीशांना पत्र देवून सर्व कोर्टांची बैठक घेण्याची विनंती केली जाणार असल्याचे सांगितले. अधिसूचना प्रसिद्ध न झालेल्या प्रकरणांबाबत अपर मुख्य सचिव (गृह) यांना पत्र देवून अधिसूचना प्रसिद्ध करण्यासह सक्षम प्राधिकारी नेमण्याची मागणी केली जाणार आहे.

मालमत्तांच्या मुल्यांकनासाठी नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांच्याकडे नोडल अधिकारी नेमण्याची विनंतीही करण्यात आली आहे. सर्व अवसायकांना त्यांच्या कार्यपद्धती निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या विषयावर पुढील आढावा बैठक एक महिन्यानंतर घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!