मनोज जरांगे यांच्या आंदोलनास मोठा धक्का !! तात्काळ मैदान सोडण्याचे आदेश !! गुन्हा हि दाखल
Manoj Jarange's protest gets a big blow!! Protest finds judicial loophole

!! मनोज जरांगेंच्या आंदोलनास मोठा धक्का !! !! तात्काळ मैदान खाली करण्याची पोलीसां कडुन मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली !!
!!!!! आंदोलकांचा उतावीळपणा भोवला !!!!!
!!!! 5 हजार आंदोलकांच्या सोबत आंदोलन करण्यास हि पोलीसांनी परवानगी नाकरली !!!!
!! जुहु येथील बसमध्ये सामान्य प्रवाशांना आंदोलकांना कडुण झालेल्या मारहाण प्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल !!
!! सामान्य नागरीकांना वेठीस धरणे !! मिडीया प्रतिनिधींना अपमाणीत करणे !! पोलीसां सोबत हुज्जत घालणे न्यायालयास खटकले !!
केशव डी मुंडे वेगवान मराठी मुंबई दिनांक 2 सप्टबर: २०२५ – दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला रविवारी तणावपूर्ण हिंसक वळण लागले !! टपोरीगीरी करत हुंदडत फिरणे ! पोलीसां सोबत हुज्जत घालणे ! मिडीयाला आपमाणीत करणे ! मुख्यमंत्री पदाची गरीमा न राखता अर्वाच्य भाषेत पाय उतार करणे ! रस्ते आडवणे ! सामान्य जनतेला नाहक त्रास देणे ! परदेशी नागरिकांना जबरदस्तीने घोषणा देण्यास मजबुर करणे
याच बरोबर जाणीवपुर्वक मुंबई मध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण करुन नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणे !! तसेच शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये जबरदस्तीने घुसुण ताबा करणे !!
यासह न्यायालयाने घालुण दिलेल्या अटी व शर्तीची पायमल्ली करत संविधानाचा भंग करणे आशा प्रकरणांमुळे मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास एक प्रकरचा ब्रेक लागला आसुन मुंबई उच्च न्यायालयाकडुण याची दखल घेण्यात आली आहे
जुहू परिसरात आंदोलक आणि बस प्रवाशांमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी आंदोलकांवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले असून, आझाद मैदानातील मर्यादित जागेमुळे अनेकांनी सीएसएमटी, मंत्रालय, मरिन ड्राईव्हसह विविध ठिकाणी मुक्काम केला.
दरम्यान, बस आणि ट्रेन प्रवासादरम्यान आंदोलक आणि प्रवाशांत शाब्दिक वादाचे व्हिडिओ समोर आले होते. रविवारी जुहू बस स्थानकात झालेल्या हाणामारीत बसच्या काचा फोडण्यात आल्या.
या घटनेनंतर जुहू पोलीस ठाण्यात अज्ञात आंदोलकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याचदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांना आझाद मैदानाव्यतिरिक्त सीएसएमटी, हुतात्मा चौक, मरिन ड्राईव्ह परिसर मंगळवारी दुपारपर्यंत रिकामा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करून सीएसएमटी व परिसर रिकामा केला असून वाहतूक पूर्ववत झाली आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावली आहे. मैदान तातडीने खाली करण्याचे निर्देश देण्यात आले असून, जरांगे यांनी प्रसारमाध्यमांत केलेल्या विधानांची दखलही नोटीसमध्ये घेण्यात आली आहे.
WEGWAN MARATHI news NETWORK maharasthra Keshav Dnyanoba Munde 8888 387 622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.







