
!! परळी चे रेल्वे स्थानक परीसर पुर्वी पासुणच अवैध धंद्याचा आड्डा बनलेले आहे !!
!!! या ठिकाणी नशेडी व गुन्हेगारी वृत्तीच्या टुक्कार मोक्कार तसेच छप्परी युवकांसह पाकीटमार बलात्कारी किडनॅपर व चोरट्यांचा सुळसुळाट आहे !!!
!! पंधरा दिवसांपूर्वीच एका परप्रांतीय तरुणीवर अपहरण करून 3 नराधामांनी आळीपाळीने बलात्कार केला होता !!
!!! या प्रकारास रेल्वे पोलीसां सह स्थानीक पोलीस प्रशासन देखील तेवढेच जबाबदार आहे !!
!! येथील अवैध धंदेवाल्यांचे हाफ्ते घेऊण कायदा आणि सुव्यवस्थेला राजरोसपणे घोडे लावण्यात पोलीसांचा सिंहाचा वाटा आहे !!
!! जगातील पंचम ज्योतिर्लिंग तिर्थ क्षेत्र वैजनाथ देवस्थानाच्या दर्शनासाठी येणाऱे भाविक देखील सदरील व्यवस्थेचे वेगवेगळ्या प्रकारे बळी ठरत आहेत !!
!! काल घडलेल्या घटणेतील पिडीत हे असाहय कुटुंब होते ! आसेच नवीन बाहेरील सावज हुडकुण त्याची शिकार करण्यात येते !!
आज दिनांक 31/08/2025 रोजी पंढरपूर येथुन एक कुटुंब मुलाबाळांसह परळी येथे आले होते. दुपारी 15:00 वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशनवरच जेवण करून सदरचे कुटुंब झोपी गेले होते.
दरम्यान रेल्वे स्टेशन परळी येथे एक आरोपी नराधम याने पिडीत बालक वय वर्ष 06 हीस रेल्वे स्टेशन वरील उड्डानपुलाकडे घेवुन जाऊन तिचेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. लैंगिक अत्याचार करुन आरोपी फरार झाला होता.
सदर घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वरीष्ठांना माहिती दिली.
त्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्री.नवनीत कॉंवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले.
सहाय्यक पोलीस अधीक्षक, पोलीस स्टेशन संभाजीनगर, स्था.गु.शा. यांनी अथक परिश्रम करून घटना घडल्यानंतर सर्व तांत्रीक बाबी तपासून 05 तासांच्या आत आरोपी निष्पन्न करुन आरोपीस तात्काळ अटक केली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








