
!! स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांची गुटखा व सुगंधी तंबाखू विरोधात मोठी कारवाई !!
वेगवान मराठी केशव डि मुंडे केज बीड मा.पोलीस अधीक्षक, बीड श्री.नवनीत कॉंवत यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी बंटेवाड यांच्या पथकाला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधक केलेला व अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला गुटखा व सुगंधी तंबाखू पकडण्यात मोठे यश आले आहे. सदरची कारवाई ही मसाजोग, ता.केज, जि.बीड येथे करण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पाथकाने एकूण ₹ 34,46,227/- किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. महाराष्ट्र शासनाने गुटखा व सुगंधी तंबाखूच्या विक्रीवर संपूर्ण बंदी घातली असतांना पण आरोपी नामे 1) रोहित आसाराम देशमुख, 35 वर्ष रा. मसाजोग ता. केज व 2) साहेबराव लिंबा आंधळे, वय 45 वर्ष रा.आंधळ्याचीवाडी ता. केज जि.बीड यांनी स्वतःचे ताब्यात बाळगल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व अंमलदार यांनी
वरील आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन केज येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस स्टेशन केज येथील अधिकारी हे करत आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात गुटखा व सुगंधी तंबाखूची अवैध विक्री रोखण्यास मोठा हातभार लागणार आहे.
ही कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.नवनीत काँवत, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री.सचिन पांडकर, श्रीमती चेतना तिडके मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस अंमलदार अनंत मस्के, विकास राठोड, सोमनाथ गायकवाड, अंकुश वरपे, राहुल शिंदे, राख, अश्फाक सय्यद, मनोज परजने, नितीन वडमारे, सिद्धार्थ मांजरे, सुनील राठोड सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








