कराड कुटुंबियांच्या मदतीसाठी सारडगांव सरसावले
Saradgaon Tax extends a helping hand to Bharat Karad's family

!! ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या कै.भरत कराडच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी सारडगांव कर सरसावले !!
परळी तालुक्यातील संत केदारी महाराज तिर्थक्षेत्री व लिंबुणी उत्पादक गांव म्हणुन देशभर प्रसिद्ध आसलेल्या सारडगांव मध्ये मदत फेरी काढून जमवला तब्बल 31000 हजाराचा मदत निधी
ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्याचे नैराश्य मनात बाळगून आत्महत्या केलेल्या स्व.भरत महादेव कराड (रा. वांगदरी, ता. रेणापूर, जि. लातूर) यांच्या कुटुंबीयांना आपल्या गावातुन देखील मदत मिळावी या सामाजिक भावनेतुन सारडगांव चे सरपंच राजेभाऊ आघाव उपसरपंच संजय तांदळे यांच्या सह गावातील सुज्ञ नागरीकां कडुण गावात मदत फेरी काढून 31 हजार रुपयांचा मदत निधी जमा केला आहे ! लवकरच तो भरत कराडच्या कुटुंबियांना सुपुर्द करण्यात येणार आहे. ..
दरम्यान ना.छगन भुजबळ व आमदार धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबियांची भेट घेतल्या नंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खालील मागणीचे पत्र दिले आहे…👇
राज्य सरकारच्या वतीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत पात्रतेनुसार नोकरी मिळवून द्यावी,
अशी मागणी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे केली आहे.
स्व.भरत कराड यांच्या पश्चात कुटुंबात आई-वडील, पत्नी, भाऊ, तीन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार असून त्यांच्या या बलिदानाने उघड्यावर पडलेल्या या कुटुंबाला राज्य सरकार न्याय देईल, असा विश्वास आहे…. धनंजय मुंडे
कराड कुटुंबियांची घरची परस्थिती पाहता राज्यभरातुन मदतीचे हात समोर येऊ लागले आहेत परंतु सारडगांवकरांनी सर्वात प्रथम पुढे येऊण मदतीचा हात दिला आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








