
बीड सह लातुर. छत्रपती संभाजीनगर, सोलापुर येथील टुचाकी चोरटा पकडला- 06 टुचाकी हस्तगत तर एकूण 05 गुन्हे उघड.
केशव डी मुंडे वेगवान मराठी दिनांक 30 सप्टेंबर बीड मा. पोलीस अधीक्षक बीड यांनी बीड जिल्हयामध्ये दुचाकी चोरणाऱ्या ईसमांची माहीती काढून कारवाई करण्याचे आदेशित केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले होते. दिनांक 29.09.2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्तबातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सचिन अकुंश कात्रे याने बीड मधील खंडेश्वरी देवी यात्रामधुन पार्कीग मध्ये असलेली युनिकॉर्न मोटार सायकल चोरली असुन तो वापरत आहे व सध्या सम्राट बीअर बार समोर उभा आहे.
माहीती मिळाल्यावरुन ताबडतोब पथकाने सदरील ठिकाणी जावुन त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे तो वापरत असलेला दुचाकी बाबत विचारपुस केली असता त्याने खंडेश्वरी देवी येथुन दुचाकी चोरल्पाचे कबुल केले त्यास अधीक चौकशी करता तयाने आनखीन मोटार सायकली चोरल्याचे सांगीतले व पांगरी रोड बीड येथे लपवुन ठेवलेले ईतर पाच अश्या एकुण सहा मोटार सायकली गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या,
सदरील मोटार सायकली त्यास कोठुन चोरले आहे असेविचारले असता त्याने लातुर, बार्शी, सोलापुर व छत्रपती संभाजीनगर येथुन चोरल्याचे सांगीतले आहे, त्याचे कडे मिळुन आलेल्या मोटार सायकलीचा पोलीस अभीलेखावर पडताळणी केली असता खालीलप्रमाणे पोलीस ठाणेला गुन्हे दाखल असल्याचे दिसुन आले.
1. पोलीस ठाणे पेठ बीड गु.र.नं 269/2025 कलम 303 (2) बी.एन.एस
2. पोलीस ठाणे एम.आय.डी.सी लातुर गु.र.नं 703/2025 कलम 303 (2) बी.एन.एस
3. पोलीस ठाणे फरासखान, पुणे शहर गु.र.नं 167/2025 कलम 303(2) बी.एन.एस
4. पोलीस ठाणे सिडको, छत्रपती संभाजीनगर गु.र.नं 463/2025 कलम 303 (2) बी.एन.एस
5. पोलीस ठाणे बार्शी शहर, सोलापुर ग्रामीण गु.र.नं 572/2025 कलम 303(2) बी.एन.एस
तरी यातील आरोपी सचिन अंकुश कात्रे, वय 45 वर्ष, रा. म्हसोबाची वाडी, ता वाशी, यांने वरील प्रमाणे दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्क्ष झाल्याने व त्यानी गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने तयाचे ताब्यातून वरील 06 मोटार सायकली जप्त केल्या असून जवळपास एकुण 3,40,000/- मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळुन आलेल्या दुचाकीचे वर्णन खालीलप्रमाणे,
1)70,000 एक काळया रंगाची होंडा कंपणीची युनिकॉर्न मॉडेलची जुनी वापरती मोटार सायकल जिचा चेसीस नंबर ME4KC311AK84968111 असलेली.
2)60,000 एक होंडा कंपणीची स्प्लेंडर प्लस मॉडेलची काळ्या रंगाची जुनी वापरती मोटार सायकल जिचा चेसीस नंबर MBLHA 10AMCHJ26305 असलेली.
3)60,000 एक होंडा कंपणीची स्प्लेंडर प्लस मॉडेलची काळ्या रंगाची जुनी वापरती मोटार सायकल जिचा चेसीस नंबर MBLHARO71JHA27182 असलेली कि.अं
4)50,000 एक हिरो कंपणीची पेंशन प्रो मॉडेलची काळ्या रंगाची ग्रे रंगाचा पट्टा असलेली जुनी वापरती मोटार सायकल जिचा चेसीस नंबर MHLJA12ACFGJ044457 असलेली
5)50,000 एकहिरो होंडा कंपणीची स्पेंडर प्रो मॉडेलची काळ्या रंगाची जुनी वापरती मोटार सायकल जिचा चेसीस MBLHA10ADB9K22457 असलेली
6)50,000 एक हिरो होंडा कंपणीची स्पेंडर मॉडेलची काळया रंगाची जुनी वापरती मोटार सायकल जिचा चेसीस नंबर MHLHAW111M5F037222 असलेली सर्व एकुण कि 3,40,000 -नंबर
वरील गुन्हयात एक आरोपी निष्पन्न झाले असुन आरोपी अटक करण्यात आले आहेत. पुढील गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार इंगोले पोलीस ठाणे पेठ बीड हे करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने एकुण 06 मोटार सायकली पकडल्या असून 05 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे.
सदरील कामगिरी श्री नवनित काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, श्री शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार विकास राठोड, आनंद मस्के, राहुल शींदे, अंकुश वरपे, आशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे, चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी मिळून केली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








