बीड

पुजा पवार यांची उप विभागीय पोलीस अधिकारी बीड पदी नियुक्ती

Pooja Pawar, popularly known as Lady Singham, appointed as Divisional Deputy Superintendent of Police

दि. 06/10/2025: रोजी पोलीस उपअधीक्षक श्रीमती पूजा पवार यांनी स्वीकारला बीड उपविभागाचा पदभार……

वेगवान मराठी बीड प्रतिनिधी केशव डि.मुंडे दि -7 /10 / 25महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 17/09/2025 रोजीच्या आदेशानुसर पोलीस उपअधीक्षक श्रीमती पूजा पवार यांचा परीविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना उपविभागीय पोलीस अधीकारी बीड म्हणून शासनाकडून जबाबदारी देण्यात आली आहे.

उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. विश्वांबर गोल्डे हे दिनांक 31/05/2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधीकारी बीड यांचे पद रिक्त होते.

दरम्यानच्या कालावधीत बीड उपविभागीय पोलीस अधीकारी पदाचा अतीरीक्त पदभार उपविभागीय पोलीस अधीकारी आष्टी श्री. बाळकृष्ण हानपूडे पाटील यांचेकडे होता.

श्रीमती पूजा पवार (मो.नं. 9225092803) यांनी आज दिनांक 06/10/2025 रोजी हजर होवून त्यांनी उपविभागीय पोलीस अधीकारी बीड पदाचा पदभार स्वीकारला आहे.

मि बीड जिल्ह्यात परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याची माहीती मला आहे.

आमच्या पदावरुन कायद्याने दिलेल्या अधिकारांचा निष्पक्षपातीपणे वापर करुन आमच्या पदाला योग्य न्याय देवू आणि बीड जिल्ह्यातील नागरीकांच्या सेवेत कायम तत्पर राहू” असे मत पोलीस उपअधीक्षक श्रीमती पूजा पवार यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान श्रीमती पूजा पवार यांच्या कडे एक धाडसी व अक्रमक पोलीस अधीकारी म्हणून पाहीले जाते आता पदोन्नति मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन व सामान्य नागरीकांना त्यांच्या कामाची उत्सुकता वाढली आहे

वेगवान मराठी & न्युज नेटवर्क महाराष्ट्रा -केशव डि मुंडे परळी वैजनाथ बीड 431515 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!