

दे. दि.शा.बीड जिल्हा पोलीसांनी 14 गुन्हयातील जप्त मुधेमाल 644.152 किलो ग्रॅम गांजा नाश केला
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षम व तत्पर कारवाईत बीड जिल्हयातील ।। पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या 14 वेगवेगळया गुन्हयामध्ये जप्त करण्यात आलेल्या एकूण 644.152 किलोग्रॅम गांजाचा नाश करण्यात आला आहे. हि कारवाई कोर्टाचे आदेशानुसार व अंमली पदार्थ टास्कफोर्स महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार मा. पोलीस अधिक्षक, बीड श्री नवनीत कांयत साहेब तथा अध्यक्ष डिस्पोजल कमिटी यांचे मार्गदर्शनाखाली सदर कार्यवाही बीड जिल्हयात दिनांक 29.09.2025 रोजी पार पाडण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत मा. पोलीस अधिक्षक, बीड श्री नवनीत कॉवत साहेब तथा अध्यक्ष डिस्पोजल कमिटी यांचे मार्गदर्शनाखाली मा.अपर पोलीस अधिक्षक, बीड श्री सचिन पांडकर साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक, अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके मॅडम तसेच क्षेत्रीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जालना श्री रविंद्र जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा बीड श्री शिवाजी बंटेवाड यांनी दोन शासकीय पंचासमक्ष पोलीस मुख्यालय, बीड येथील सिलबंद गोडाउन मधुन बीड जिल्हयातील ।। पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या 14 गुन्हयातील जप्त गांजा एकुण 644.152 किलोग्रॅमचा मुद्येमाल नाश करण्यात आला आहे.
मुद्येमालाचा नाश केल्या नंतर म.प्र.नि.मंडळ यांचे प्रमाणपत्र घेण्यात आले असून अंमली पदार्थ निर्मूलन व समाजामध्ये जनजागृतीसाठी बौड पोलीस पोलीसांकडुन सातत्याने प्रभावी मोहिम राबवली जात आहे. अशा कारवायामुळे जिल्हयातील गांजा व इतर अंमली पदार्थाच्या अवैध व्यापाराला आळा बसणार आहे. व समाजाची नशा मुक्त समाजाकडे वाटचाल या उद्दीष्टाने पोलीस विभाग ठामपणे काम करत आहे.
वरिल संपूर्ण कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक, बीड श्री नवनीत कॉवत साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मा.अपर पोलीस अधिक्षक, बीड श्री सचिन पांडकर साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक, अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके मॅडम तसेच क्षेत्रीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ जालना श्री रविंद्र जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा बोड श्री शिवाजी बंटेवाड, NDPS सेलचे नोडल अधिकारी सपोनि श्री रत्नाकर घोळवे, दहशतवाद विरोधी शाखा, बीड, पोलीस अंमलदार युनुस बागवान, राजेश नेहरकर, खमर शेख, गोविंद राख, अलीम शेख, नारायण कोरडे, अमोल ससाणे असे पोलीस विभागातील अधिकारी व अंमलदार यांनी उपस्थीत राहून सदरची कार्यवाही पार पाडली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








