
परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील सोमेश्वर मंदिरातील घडलेल्या चोरीच्या घटनेतील सस्पेन्स संपला
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे –दिनांक 25/11/2025 रोजी रात्री 10.30 वा.ते दिनांक 26/11/2025 रोजी सकाळी 05.00 वा च्या दरम्यान जिरेवाडी ता. परळी वैजीनाथ जि.बीड येथील सोमेश्वर संस्थानाचे मंदिराचे सभागृहाचे गेटचे कुलूप तोडुन आत प्रवेश करुन मंदिराचे गाभा-यातील दानपेटीचे कुलूप तोडुन अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन मंदिरातील दानपेटीतील रक्कम अंदाजे 30,000/- रुपये व मौल्यवान दागीने चांदीची चंद्रकोर, एक ग्राम वजनाचे सोन्याचे टाक चोरले होते.
त्यावरुन फिर्यादी पाटलोबा सिताराम मुंडे वय 45 रा.जिरेवाडी सोमेश्वर संस्थान जिरेवाडी समिती उपाध्यक्ष रा.जिरेवाडी ता. परळी वैजीनाथ यांच्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन परळी ग्रामीण गुरनं 499/2025 कलम 331(4), 305 (अ) बीएनएस प्रमाणे दिनांक 26/11/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता
नमुद गुन्हयाचा बारकाईने तपास करुन आणि गोपनिय बातमीदारांकडुन सदर गुन्हयातील आरोपींबाबत अधिक माहिती प्राप्त करुन घेऊन
।) वैभव विष्णु कोकरे वय 19 रा.दौनापूर तालुका परळी वैजीनाथ, 2) बालाजी बबन थाटकर वय 28 रा. समतानगर अंबाजोगाई,
3) महादेव बाबुराव माने, वय 22 रा.वानटाकळी ता. परळी वैजीनाथ, 4) छगन नानाजी खैरमोडे वय 32 वर्षे, रा. रविवारपेठ, परळीवेस, भोईगल्ली अंबाजोगाई, 5) ऋषीकेश दगडु माने वय 22 वर्षे रा.वानटाकळी तालुका परळी वैजीनाथ
यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींच्या ठावठिकाण्या बाबत माहिती काढुन नमुद आरोपी यांना दिनांक 04/12/2025 रोजी सदर गुन्हयात अटक करुन
त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल आणि त्यांनी मंदिरातुन चोरलेली चांदीची चंद्रकोर, एक ग्राम वजनाचे सोन्याचे टाक, 1700/- रुपये त्यांच्याकडुन जप्त करण्यात आलेले आहेत.
सदर गुन्हयातील उर्वरीत रोख रकमेसंबंधाने आणि त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले हत्यार याबाबत त्यांच्याकडे तपास करण्यासाठी त्यांची मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैजीनाथ यांचे न्यायालयाकडुन दिनांक 08/12/2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर करुन घेण्यात आली आहे.
सदर गुन्हयाच्या तपासात मा.श्री. नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक बीड, मा.श्री. सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, मा. श्रीमती. चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई, मा.श्री. वेंकटराम, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उप विभाग अंबाजोगाई यांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन
पोनि.एम.ए. सय्यद, सपोनि मेंडके, पोउपनि निमाणे, पोउपनि. शेख, सफौटोले, पोहवा/हरगांवकर, पोहवा /परजने, पोअं.घोडके, पोअं. केदार, चापोअं. वाघमारे पोलीस स्टेशन परळी ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघडकिस आणला असुन सदर गुन्हयाचा तपास पोउपनि निमोणे हे करत आहेत.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








