
!! आरोपीं मध्ये मरळवाडी, पांगरी,दाऊतपुर,व सिद्धार्थ नगर येथील युवकांचा सहभाग !!
!! रोडवर जाणारे वाहन चालकाच्या डोळ्यात मिरची चटणी टाकुन शस्त्राचा धाक दाखवुन जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा बीड याचं कारवाई !!
दिनांक 05/12/2025 रोजी एक इसम हा अरुणोदय मार्केटमधील बॉस फिटनेस येथे व्यायाम करून त्याचे गावाकडे धारावती तांडा येथे मोटारसायकल वर जात असताना काळरात्री देवी मंदीर रोडने पुढे गेल्यावर संध्याकाळी 07.30 वा सुमारास त्याच्या मोटार सायकलला दोन इसम पाठीमागून येऊन त्यांचेकडील पल्सर मोटार सायकल आडवी लावून फिर्यादीला थांबवले.
त्यानंतर स्कुटीवर आणखी दोघांनी येऊन त्या इसमास चाकूचा धाक दाखवून त्या इसमाचे डोळ्यात चटणी टाकून त्याची सोन्याची चैन व दोन अंगठ्या जबरीने चोरून नेल्यावरून
पोलीस स्टेशन परळी ग्रामीण येथे गुर.नं. 507/2025 कलम 309 (4),126, 281,3(5) भा.न्या.सं.प्रमाणे गुन्हा दाखल झाला. त्यावर मा.पोलीस अधीक्षक साहेब बीड यांनी बीड जिल्हयात रोडवर होणारे जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले आहे.
त्यावरून पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे व त्यांचे पथक यांना दिनांक 08/12/2025 रोजी परळी येथे वरील गुन्ह्यात तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,
आरोपी नामे 1) पंकज तुकाराम उगलमुगले वय 25 वर्षे रा. पाडळी ता. शिरुर कासार ह.मु. पांगरी ता. परळी, जि.बीड 2) वैभव राम बिडगर, वय 20 वर्षे रा. दाऊतपूर ता. परळी जि.बीड 3) श्यामसुंदर बालासाहेब फड वय 20 वर्षे रा. मरळवाडी ता. परळी जि.बीड 4) आदित्य सुरेश उपाडे वय 20 वर्षे, रा. सिध्दार्थ नगर, परळी जि.बीड यांनी गुन्हा केला आहे.
त्यावर पोउपनि सुशांत सुतळे व पथक यांनी तात्काळ सदरील इसमांना शिताफिने पकडून त्यांचेकडे विचारपूस करून तपास केला. सदरील इसमांनी परळी येथील बॉस फिटनेच्या
बाहेरून फिर्यादीचा पाठलाग करून त्याची मोटार सायकल जबरीने थांबवून त्याचे डोळ्यात मिरचीची चटणी टाकुण शस्त्राचा धाक दाखवुन त्याची चैन व अंगठी जबरीने चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
वरील गुन्ह्यात चोरी गेलेली चैन, अंगठी, मोटार सायकल, स्कुटी व एक कोयता असा एकूण 1,58,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
सदरची कामगिरी श्री. नवनीत काँवत पोलीस अधीक्षक, बीड, श्रीमती चेतना तिडके अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शिवाजी बंटेवाड पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड, पोलीस उप निरीक्षक श्री. सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णू सानप, गोविंद भताने, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, चालक पो. ह. अतुल हराळे यांनी केलेली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








