बीड

हाकाऱ्या-पुकाऱ्या माळा वरील यात्रा महोत्सव दोन दिवसाची जय्यत तयारी

Shri Kshetra Hakarya Pukarya Sant Kedari Maharaj Devasthan Yatra Festival Vaijwad

परळी / प्रतिनिधी दिनांक १० डिसेंबर २०२५ परळी वैजनाथ, सोनपेठ आणि गंगाखेड तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत केदारी महाराज यांच्या

हाकाऱ्य पुकाऱ्या माळा वरील अखंड हरिनाम सप्ताहा व यात्रा उत्सवास दोन दिवसा नंतर आरंभ

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे ( उप संपादक महाराष्ट्र वेगवान मराठी न्यूज नेटवर्क)

तालुक्यातील वैजवाडी येथील श्री गुरु संत केदारी महाराज साधना स्थळ हकाऱ्यामाळ येथे 13 ते 20 डिसेंबर 2025 दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताह निमित्त महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार गायक वादक आणि भजन असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

तरी परळी पंचक्रोशीतील भाविकांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संत सोपान काका महाराज उखळीकर फडाच्या वतीने करण्यात आले आहे.

परळी पंचक्रोशीतील सर्व भाविकांना कळविण्यात आनंद होतो की श्री संत केदारी महाराज यांच्या पदपरश्याने पावन झालेल्या हकाऱ्या माळ येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे

श्री संत केदारी महाराजांनी हकाऱ्या माळावर बरीच वर्ष भजनाची साधना केलेली आहे त्याच ठिकाणी श्री संत सोपान काका महाराजांनी पंचक्रोशीतील टाळकरी व अन्नदात्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाची सुरुवात केली

पुढे वैकुंठ ह भ प पंढरीनाथ महाराज वैकुंठ उत्तम महाराज उखळीकरांनी या कार्यक्रमाची जोपासना केली आणि मार्गशीष अमावस्येला या यात्रा भरवली जाते

आजही या यात्रेनिमित्त भाविक श्री संत केदारी महाराजांच्या दर्शनासाठी आवर्जून येतात आजही कार्यक्रमाची जोमाने वाटचाल सुरू आहे तरी भाविकांनी या अखंड हरिनाम सप्ताहात सर श्रवणमृताचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा

तसेच ह भ प भागवतचार्य संतोष महाराज वनवे,

ह भ प भागवताचार्य अच्युत महाराज डोंगरे, ह भ प चैतन्य महाराज उखळीकर,

ह भ प भागवताचार्य वासुदेवानंद महाराज शास्त्री, ह भ प भागवताचार्य केशव महाराज घुले टाकळीकर,

ह भ प भागवताचार्य बाळु महाराज उखळीकर, ह भ प रामकृष्ण महाराज सानप येवला

यांची कीर्तन सेवा होणार आहे तर 20 डिसेंबर रोजी पहाटे पाच ते सात काल्याचे किर्तन ह भ प भागवताचार्य माधव महाराज उखळीकर यांचे होणार आहे

तरी भाविकांनी या सर्व सप्ताहातील धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह भ प केशव महाराज, ह भ प विठ्ठल महाराज उखळीकर, उखळीकर ह भ प विश्वंभर महाराज उखळीकर, दीनानाथ उत्तम महाराज उखळीकर

व समस्त उखळीकर महाराज मंडळी व उखळीकर फडावरील संपूर्ण भजनी मंडळी हकाऱ्या माळ वैजवाडी तसेच श्री संत केदारी महाराज युवा मित्र मंडळ व समस्त गावकरी मंडळी वैजवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!