सेवक राम जाधव यांच्या बातमी मुळे नगर पालिका प्रशासन झाले खडबडून जागे
Sevakram jadhav wegwan marathi parli nagaarpalika

*सेवकराम जाधव यांच्या मागणीची नगर पालिके कडून दखल*
*वाळत असलेल्या झाडांना तात्काळ पाणी देण्यास केली सुरुवात*
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे परळी वैजनाथ : दिनांक 10 डिसेंबर 2025
राजमाता जिजामाता उद्यानातील तसेच एकमिनार चौक ते डॉ. अब्दुल कलाम चौक पासून ते संत जगमित्र नागा मंदिर या रस्त्याच्या मधोमध लावलेली झाडे पाण्यावाचून अक्षरशः वाळून जात होती. या झाडांना तात्काळ पाणी देण्याची मागणी सेवकराम जाधव यांनी केली होती.
परळी शहराचे वैभव असलेले राजमाता जिजामाता गार्डन येथील हराळी सह छोटी मोठी झाडें त्याच बरोबर परळी शहरातील एकमिनार चौक ते डॉ. अब्दुल कलाम चौक इथं पासून ते संत जगमित्र नागा मंदिर पर्यंत रस्त्याच्या मधोमध लावलेली सम्पूर्ण झाडे ही पाण्यावाचून वाळुन जात होती.
या झाडांना नगर पालिका प्रशासनाने तात्काळ पाणी द्यावे. जेणेकरून लाखो रुपये खर्च करून लावलेली ही झाडे वाळुन जाण्यापासून वाचतील.अशा स्वरूपाची मागणी नगर पालिका प्रशासनाकडे केली होती. याची दखल घेत नगर पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांनी आजचे आज झाडांना तात्काळ पाणी देण्याची व्यवस्था केली. या बद्दल श्री रोडे यांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.
तसेच या बातमीला योग्य न्याय दिल्या बद्दल परळी वैजनाथ येथील वर्तमान पत्र व सन्माननीय संपादक यांचे सेवकराम जाधव यांनी आभार व्यक्त केले.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








