राजकारण

रावसाहेब दानवे विषयी सोयगाव तालुक्यातून नाराजीचा सूर का?

वेगवान मराठी / विजय  चौधरी 

सोयगाव, ता. 29 एप्रिल 2024 –  लोकसभा २०२४ निवडणूक साठी साहव्यांदा जालना मतदार संघातून रावसाहेब दानवे यांना भाजपकडून संधी देण्यात आली यावेळी शिंदे गट सोबत असून सोयगाव-सिल्लोड मतदार संघातुन मंत्री अब्दुल सत्तार यांची साथ मिळणार आहे ,मात्र सोयगाव शहरासह ग्रामीण भागातून दानवे यांच्या विषयी नाराजी दिसून येत आहे.Why is the village angry about Raosaheb?

मोफत बोअरवेल करा सरकार देणार पैसे ! Boring for free, the government will pay!

याचाच प्रत्यय ता.२९ रावसाहेब दानवे यांच्या प्रचार सभेला जरंडी येथे दिसून आला जरंडी येथे दानवे यांच्या प्रचार सभेचे आयोजन केले होते यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची देखील सभेला उपस्थिती होती दानवे यांच्या प्रचार सभेला अवघ्या दीडशे ते दोनशे लोकांची उपस्थिती दिसुन आली .

यावेळी रावसाहेब दानवे व अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यातील लोकांचीच जास्त संख्या दिसून आली
यावेळी अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना रावसाहेब दानवे यांना निवडून देण्याची केविलवाणी साद घातली यावेळी रावसाहेब दानवे यांनी बोलताना सांगितले की मला पुन्हा सहाव्यांनदा निवडून द्यावे मी सोयगाव तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जालना मतदार संघातील सोयगाव सर्कल मधील जनतेच्या मनात रावसाहेब दानवे यांच्या बद्दल रोष असल्याचे बोलणे जात असताना २५ वर्षात एकदाही लोकसभा निवडणूक प्रचार सभा न घेतलेल्या रावसाहेब दानवे यांना लोकसभा २०२४ साठी अब्दुल सत्तार यांच्या सहकार्याने सभा घ्यावी लागली जरंडी सभेला दानवे समर्थक कमी आणि अब्दुल सत्तार यांचे समर्थक संख्या बऱ्यापैकी दिसून आली यावेळी उपस्थित लोकांमध्ये नाराजीच दिसून आल्याने अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना केविलवाणी साद घालत दानवे यांना पुन्हा संधी द्यावी असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!